व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा मिटणार? वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

लोणावळा शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 13, 2023
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
traffic-jam-problem-in-Lonavala

Photo Courtesy : DIO / Pune


लोणावळा शहरातील वाहतूक समस्येविषयी शास्त्रशुद्ध पध्दतीने अभ्यास करुन वाहतूक व्यवस्थापन आराखडा आठवड्याभरात तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली लोणावळा नगरपरिषद कार्यालयाच्या स्थायी समिती सभागृहात शहरातील वाहतूक समस्येवरील उपाययोजनेबाबत बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, मुळशी-मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, वडगाव मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील आदी उपस्थित होते. ( traffic jam problem in Lonavala Instructions by Collector to prepare City Traffic Management Plan )

Novel NIBR Ads

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

डॉ. देशमुख म्हणाले, शहरातील वाहतूकीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाच्यावतीने तात्काळ कार्यवाही करावी. शहरातील वाहतूक समस्येबाबत व्यापारी संघटना, सामाजिक संस्था, रिक्षा संघटना आदींसोबत नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांनी बैठक घेवून त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात. कुसगाव टोल नाका आणि वरसोली टोल नाका या दोन्ही नाक्यावर नागरिकांना पथकर भरावा (टोल) लागत असल्यामुळे याबाबत शासनाकडे प्रस्ताव सादर करावा. शहराची सर्व अर्थव्यवस्था पर्यटनावरच अवलंबून असल्यामुळे पर्यटकांना मुलभूत सूविधा पुरिवण्याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.

लोणावळा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. डुबल यांनी लोणावळा परीक्षेत्रातील वाहतुकीची व पार्किंगची समस्या आणि त्यावरील उपाय योजनांची विस्तृत माहिती दिली. पुणे व मुंबई या शहरांच्या मध्यवर्ती असे लोणावळा शहर असल्याने पर्यटकांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे अपोलो गॅरेज ते भारत पेट्रोलियम पंप वळवण या ठिकाणी वाहतूक कोंडी होते. यासाठी पर्यायी मार्ग सूचविण्यात आले.

हेही वाचा – मावळ तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक; शिळींब, लोहगड, सांगिसेसह ‘या’ ग्रामपंचायतींचा समावेश

Novel NIBR Ads

कुमार चौक ते भांगरवाडी रस्ता रुंदीकरण, शहरातील व मुंबई पुणे महामार्गावरील रिक्षा स्थानकाचे नियोजन करणे, संबंधितांना पर्यायी जागा उपलब्ध करुन देणे, वाहनांसाठी पुरेशी पार्किंग व्यवस्था नगरपरिषदेने उपलब्ध करणे, सिग्नल यंत्रणा सुरु करणे, नवीन सिग्नल बसविणे, भटकी जनावरे, अनधिकृत फेरीवाले, भाजी विक्रेते यांचा बंदोबस्त करणे, भांगरवाडी व खंडाळा येथील ओव्हर ब्रीज बसविणे, लोणावळा शहरातील बस स्थानकासाठी शहराबाहेर स्थलांतरीत करणे, व्यापारी वर्गाकरिता लोडींग-अनलोडींग वेळ निश्चित करणे आदी विषयावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर श्री. देशमुख यांच्या हस्ते श्रीराम क्रीडा मंडळ लोणावळा येथील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले. ( traffic jam problem in Lonavala Instructions by Collector to prepare City Traffic Management Plan )

अधिक वाचा –

– अतिक्रमणविरोधी कारवाईत झालेल्या वादामुळे व्यापाऱ्यांचा बंद, शगुन चौकात ठिय्या आंदोलन
– मोठी बातमी! पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, अचानक हार घेऊन पुढे आला व्यक्ती आणि… पाहा व्हिडिओ


dainik maval jahirat

Previous Post

मावळमधील 11 ग्रामपंचायतींवर प्रशासक; पाहा ग्रामपंचायतींची यादी आणि अंतिम मुदतेसह नेमणूक केलेल्या प्रशासकाचे नाव

Next Post

प्रशासक म्हणजे काय? मावळ तालुक्यातील किती ग्रामपंचायतींवर प्रशासक? गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची मुलाखत – व्हिडिओ

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Sudhir-Bhagwat

प्रशासक म्हणजे काय? मावळ तालुक्यातील किती ग्रामपंचायतींवर प्रशासक? गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची मुलाखत - व्हिडिओ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.