पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्या आदेशाने, पुणे जिल्ह्यातील जानेवारी 2023 ते मार्च 2023 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीवर निवडणूक आयोगामार्फत विधीग्राहय ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत सदर ग्रामपंचायतीवर प्रशासकीय कामकाजाच्या सोईचे दृष्टीने प्रशासकाची – नियुक्ती करण्याबाबत प्रशासक नेमणूकीचे पत्रक काढण्यात आले आहे. ( Administrator At 11 Gram Panchayats In Maval Taluka See Full List )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार मावळ तालुक्यातील मुदत संपलेल्या आणि संपणाऱ्या अशा 11 ग्रामपंचायतींवर प्रशासक कोण असणार, यांची यादी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार आंबळे, बेबडओहोळ, भाजे, मुंढावरे, उघेवाडी, सांगिसे, आढले बुद्रूक, शिळींब, डोणे, साळूंब्रे, लोहगड या ग्रामपंचायतींचा ऑर्डरमध्ये सामवेश आहे.
ग्रामपंचायत चे नाव – मुदत संपण्याचा कालावधी – प्रशासकाचे नाव
आंबळे – 22 फेब्रुवारी 2023 – श्री बी डी वायकर
बेबेडओहोळ – 22 फेब्रुवारी 2023 – श्री बी डी वायकर
भाजे – 2 मे 2023 – श्री ए के खांडेकर
मुंढावरे – 2 मे 2023 – श्री ए के खांडेकर
उघेवाडी – 5 जानेवारी 2023 – श्री ए के खांडेकर
सांगीसे – 2 मे 2023 – श्री ए के खांडेकर
आढले बुद्रुक – 3 जानेवारी 2023 – श्री एन जे ढवळे
शिळींब – 23 फेब्रुवारी 2023 – श्री एन जे ढवळे
डोणे – 4 जानेवारी 2023 – श्री एन जे ढवळे
साळूंब्रे – 4 जानेवारी 2023 – श्री एन जे ढवळे
लोहगड – 27 फेब्रुवारी 2023 – श्री एन जे ढवळे
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक; शिळींब, लोहगड, सांगिसेसह ‘या’ ग्रामपंचायतींचा समावेश
– मोठी बातमी! जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचे निधन, 75 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास