मावळ तालुक्यातील कार्लागडावरील श्री आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकभक्त आणि पर्यटक येत असतात. मात्र, या पर्यटकांना गडावर पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. परंतू आता पर्यटकांसह भाविकांचा हा त्रास कायमचा दूर होणार आहे. इतके नाही तर अवघ्या तीन मिनिटात कार्ला गडावर पोहोचता येणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
कार्ला गडावर असलेले आई एकविरा देवीचे मंदिर, कार्ला लेणी आदी गोष्टींमुळे इथे पर्यटनासाठी वर्षभर पर्यटक येत असतात. परंतू, गडावर पोहोचण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे असतात. त्यामुळे कधी कधी पर्यटक इच्छा असूनही वर जात नाही. हिच तऱ्हा अनेक नेते-कलाकार यांच्याबाबतही आहे. परंतू आता शासनाने यावर उपाय काढला आहे. स्थानिकांची मागणी, राजकीय नेत्यांचा पाठपुरावा आणि येथील गरज लक्षात घेता रोप-वे साठी प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. त्यानंतर याबाबत एक गुडन्यूज समोर येत आहे. ( Rope Way Will Be Built Soon At Karla Gad Ekvira Devi Temple Maval Taluka )
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कार्ला गडावर रोपवे प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी सल्लागार कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. या कंपनीकडून सविस्तर प्रकल्प अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या ठिकाणी हा रोपवे झाल्यास दर तासाला सुमारे 1 हजार 440 नागरिक गडावर पोचणार असून या प्रकल्पामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. प्रकल्पासाठी सुमारे 36 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. रोपवे प्रकल्प सुमारे 120 मीटर उंचीवर असून लांबी सुमारे 290 मीटर इतकी आहे. रोप-वे संदर्भातील प्रकल्प अहवाल राज्य शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी दिली.
अधिक वाचा –
– खुशखबर! राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात तीनपटीने वाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
–दहशत कायम..! नाणे मावळातील पाले गावात बिबट्याच्या हल्ल्यात गरीब शेतकऱ्याच्या शेळ्या ठार