व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, August 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खुशखबर! राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात तीनपटीने वाढ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 15, 2023
in महाराष्ट्र, पुणे, मावळकट्टा, शहर
Maharashtra-Kesari-2022-2023-Pune

Photo : Twitter / Devendra Fadanvis


आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढवणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले. पुण्यातील स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित 65व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2022-23 च्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. फडणवीस यांच्या हस्ते ‘महाराष्ट्र केसरी’ विजेता पैलवान शिवराज राक्षे याला मानाची गदा प्रदान करण्यात आली.

कार्यक्रमाला क्रीडा मंत्री गिरीष महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार ब्रिजभुषण शरण सिंह, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, हिंदकेसरी पै.अभिजीत कटके आदी उपस्थित आदी उपस्थित होते. ( Maharashtra Kesari 2022-2023 Pune Increase In Salary Of Wrestlers Devendra Fadnavis Announcement )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामान्य घरातील युवक कुस्ती खेळतात. ते चांगली मेहनत करतात आणि त्यांना तेवढाच चांगला खुराकही लागतो. अशा खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी ऑलिम्पिक स्तरावर यशस्वी राज्यातील मल्लांना 6 हजार ऐवजी 20 हजार रुपये मानधन देण्यात येईल. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद विजेत्या मल्लांचे मानधन 4 हजारावरून 15 हजार रुपये, अर्जुन पुरस्कार विजेत्यांना 6 हजार ऐवजी 20 हजार रुपये, वयोवृद्ध खेळाडूंना अडीच हजार ऐवजी साडेसात हजार रुपये मानधन देण्यात येईल. मागील काळात तीन खेळाडूंना थेट पोलीस उपअधीक्षक पदावर नोकरीची संधी दिली, तशी संधी देण्याचे काम यापुढेही निश्चितपणे करण्यात येईल.

अंतिम फेरीचा सामना खेळला जाण्याआधी प्रचंड संख्येने जमलेल्या प्रेक्षकांशी संवाद साधला.

????‍♂️खाशबा जाधव यांनी देशाला पाहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले तशी कामगिरी नंतर कुस्तीत कोणी केली नाही. महाराष्ट्र मागे का राहिला याचा विचार आपल्याला करावा लागेल.#MaharashtraKesari pic.twitter.com/nY69DVlC6r

— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) January 14, 2023

डोळ्यांचे पारणे फेडणारी स्पर्धा संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केल्याबद्दल कौतुक करून क्रीडामंत्री महाजन म्हणाले, कुस्ती हा खेळ मेहनतीचा आणि बुद्धी चातुर्याचा आहे. पैलवानांना खूप कष्ट करावे लागते. आयुष्यभर कष्ट करून देशाला नाव मिळवून देणाऱ्या पैलवानांना तुलनेत त्यांना मिळणारे मानधन कमी आहे. या मानधनात भरीव वाढ करून पैलवानांचा सन्मान केला जाईल. शासनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक पटकावणाऱ्या खेळाडूंना देण्यात येणाऱ्या रकमेत 10 लाखावरून 50 लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. पैलवानांचाही सन्मान करण्याची जबाबदारी राज्य शासनाची आहे.

अधिक वाचा –

– मोठी बातमी! शिवराज राक्षे बनला 46वा महाराष्ट्र केसरी, महेंद्र गायकवाडला चीतपट करत पटकावली मानाची गदा
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन


dainik maval jahirat

Previous Post

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड भागातील विकासकामांचा आमदार शेळकेंकडून आढावा; किन्हई, चिंचोलीचा पाणीप्रश्न सोडवण्याचे आश्वासन

Next Post

मोठी बातमी! विमान दुर्घटनेत 5 भारतीयांसह 72 जणांचा दुर्दैवी अंत । Nepal Plane Crashed

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Nepal-Plane-Crashed

मोठी बातमी! विमान दुर्घटनेत 5 भारतीयांसह 72 जणांचा दुर्दैवी अंत । Nepal Plane Crashed

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval BJP threatens Bakasur Bhagao agitation administration given seven-day deadline to fill potholes

मावळ भाजपाचा ‘बकासूर भागो’ आंदोलनाचा इशारा ; रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रशासनाला सात दिवसांची मुदत

August 12, 2026
issue of highly vulnerable villages in Maval has reached ministry rehabilitation of Patan village is confirmed

मावळच्या अतिधोकादायक गावांचा प्रश्न थेट मंत्रालयात धडकला ; पाटण गावचे पुनर्वसन निश्चित, इतर आठ गावांचे दहा दिवसांत सर्वेक्षण

August 12, 2026
Lonavala Kumar Chowk to Tiger Point road project PMRDA Abhijit Chaudhari MLA Sunil Shelke on-site inspection

लोणावळा कुमार चौक ते टायगर पॉईंट रस्त्याला मिळणार गती ; पीएमआरडीए आयुक्त अभिजीत चौधरी, आमदार सुनील शेळके यांचा प्रत्यक्ष पाहणी दौरा

August 12, 2026
Traffic diversions for three hours on Connecting Link Missing Link of Mumbai-Pune Expressway

महत्वाची बातमी ! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘कनेक्टिंग लिंक’वर (मिसिंग लिंक) बुधवारी तीन तास वाहतूक बदल

August 11, 2026
Individual found in possession of cannabis apprehended within Lonavala Rural Police Station limits

Lonavala Police : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत गांजा बाळगणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

August 11, 2026
Four youths from Maval Taluka Pune died in an accident on Pune-Satara highway at Shirwal

Shirwal Satara Road Accident : शिरवळ येथे पुणे-सातारा महामार्गावर झालेल्या अपघातात मावळातील चार युवकांचा मृत्यू

August 11, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.