पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांचा शनिवारी (17 सप्टेंबर) रोजी 72वा वाढदिवस ( Birthday ) आहे. नरेंद्र मोदी यांचे समर्थक आणि चाहते जगभर आहेत. त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसाला अनेक कार्यक्रमांची आखणी केली जाते. अशात दक्षिण भारतातून समोर आलेल्या एका बातमीची चांगलीच चर्चा होत आहे.
शनिवारी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी जन्मणाऱ्या नवजात अर्भकांना सोन्याची अंगठी ( Gold Rings For Infants Born ) देणार असल्याची घोषणा तामिळनाडू भारतीय जनता पार्टीच्या युनिटने ( Tamil Nadu BJP Unit ) केली आहे. त्या खेरीज 720 किलो मासे देखील वाटले जाणार आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
तामिळनाडूचे मत्स्य पालन आणि सूचना व प्रसारण राज्य मंत्री एल. मुरुगन यांनी याबाबत माहिती दिली. ‘आम्ही या कार्यक्रमासाठी आणि योजनेसाठी चेन्नई येथील आरएसआरएम हे सरकारी रुग्णालय निवडले आहे. या रुग्णालयात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवशी जन्मणाऱ्या सगळ्या बाळांना सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे’, असे मुरुगन यांनी सांगितले.
अशी असेल अंगठी…
प्रत्येक अंगठी ही कमीत कमी 2 ग्रॅमची असेल, ज्याची किंमत 5 हजार रुपये एवढी असू शकते. या माध्यमातून आम्ही पंतप्रधांच्या वाढदिवशी जन्मलेल्या मुलांचे स्वागत करणार आहोत, असे मंत्री मुरुगन यांना म्हटले. येत्या 17 सप्टेंबर रोजी आरएसआरएम रुग्णालयात 10 ते 15 मुलांचा जन्म होणे अपेक्षित आहे. ( PM Narendra Modi Birthday Tamil Nadu BJP Unit To Provide Gold Rings For Infants Born On September 17 )
अधिक वाचा –
टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर निवृत्त..! फेडररने नेमकं काय कमावलंय? नक्की वाचा…
मोठी बातमी! जगभरातील हिंदू धर्मियांवर शोककळा, सर्वात मोठ्या धर्मगुरुचे निधन