महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दीपक सावंत यांच्या मानेला आणि पाठीला गंभीर इजा झाली असून त्यांच्यावर अंधेरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. डॉ. दीपक सावंत हे आज (शुक्रवार, दि. 20 जानेवारी) सकाळच्या सुमारास काशिमीरा येथून पालघरच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला, अशी माहिती समोर येत आहे. ( Maharashtra Former Health Minister Dr Deepak Sawant Car Accident Seriously Injured )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पालघरच्या दिशेने जात असताना त्यांच्या कारला डंपरने पाठीमागून धडक दिली, यात सावंत यांच्या कारचे मोठे नुकसान झालं आहे. पालघरला आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करायला जात असताना सावंत यांच्या कारला डंपरने धडक दिली.
मागील काही दिवसांपासून राज्यात लोकप्रतिनिधींच्या वाहनांचा अपघात होण्याची संख्या वाढली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार जयकुमार गोरे, योगेश कदम, बाळासाहेब थोरात यांच्या वाहनाला अपघात झाल्याच्या घटना समोर आल्या. तर काही दिवसांपूर्वी शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अधिक वाचा –
– केंद्रातील मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच, शिंदे गटाला तीन मंत्रिपदे मिळण्याची शक्यता, बारणेंचं पारडं जड
– प्राणीमित्रांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट; बाथरुममध्ये अडकलेल्या उदमांजराच्या पिल्लांची सुटका – पाहा व्हिडिओ