मावळ तालुक्यातील महागाव येथील ढालेवाडी येथे महिलावर्गासाठी शिवणकाम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला होता. दिनांक 18 जानेवारी रोजी (बुधवार) हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे आणि फिंचम इंडिया CSR यांच्या उपजिविका आणि पर्यावरण संवर्धन केंद्रित हरित ग्रामनिर्माण प्रकल्पाअंतर्गत ग्रामीण भागातील अनेक उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महागाव येथे हा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर शिवणकाम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महागाव गावातील ढालेवाडी येथील 16 महिलांना शिवणकाम कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले. शिवणकाम कौशल्य प्रशिक्षणास प्रशिक्षक नसीम इनामदार यांनी हे शिवणकाम कौशल्य महिलांना शिकवले आहे. सदर प्रशिक्षण कालावधी 45 दिवसाचा होता, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र देण्यात आले. ( Sewing Skill Training Program In Mahagaon Village Maval Taluka )
हेही वाचा – मावळ तालुक्यातील महागाव येथे मोफत पशुवैद्यकीय शिबीर – व्हिडिओ
शिवणकाम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश हा ग्रामीण भागातील महिलांकरिता नवीन फॅशन नुसार कपड्याची मागणी वाढत आहेत, त्यात बदल करून त्यामध्ये शिवणकाम काम केले तर त्यातून व्यवसाय निर्मिती आणि जास्तीस्त जास्त उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. तसेच महिलांच्या शिवण काम ज्ञानामधे भर पडणार आहे.
शिवणकाम कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्थेकडून ओंकार कुलकर्णी आणि अश्र्विनी खराडे इत्यादी संस्था प्रतिनिधी उपस्थित होते. संस्थेकडून ओंकार कुलकर्णी यांनी शिवणकाम प्रशिक्षणास सहभागी महिलांचे, गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत रौप्यपदक पटकावणाऱ्या मावळमधील पैलवानांच्या पाठीवर आमदार शेळकेंची कौतुकाची थाप
– बालाजी तांबे फाउंडेशनतर्फे कार्ला येथील शाळेला अद्ययावत संगणक कक्ष भेट, आमदार शेळकेंच्या हस्ते उद्घाटन, पाणपोईचेही भुमीपूजन