दिनांक 15 ते 20 जानेवारी 2023 दरम्यान पाॅवरलिफ्टींग इंडिया आणि महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर (औरंगाबाद) येथे झालेल्या राष्ट्रीय (National) बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस लोणावळा यांना घवघवीत यश मिळाले आहे. ( Athletes Of Shivdurg Fitness Lonavala Achieved Great Success In National Bench Press Competition Aurangabad )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर स्पर्धेत कुमारी तपस्या अशोक मते सुवर्णपदक, कुमारी खुषी बडेला कांस्यपदक, कुमारी रबिहा पाटका रौप्य पदक, कुमार राजेश तिकोणे पाचवा क्रमांक, सुनिल सपकाळ सहावा क्रमांक, अशोक मते रौप्य पदक तर राष्ट्रीय विक्रम करत ज्योती कंधारे यांनी दोन सुवर्णपदके मिळविली. शिवदुर्ग फिटनेसच्या या यशाने पुणे जिल्ह्याच्या व महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेसचे कोच अशोक मते सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.
अधिक वाचा –
– नाणेघाटात तब्बल 1200 फूट खोल दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह शोधण्याचा थरार! शिवदुर्ग टीमची साहसी कामगिरी
– अपघात ब्रेकिंग! खंडाळा ते मंकीहील दरम्यान धावत्या रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू