व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, August 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

बाळासाहेब ठाकरे जयंती : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा । Balasaheb Thackeray

तब्येत खालावल्याने बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांना मुंबईतील ( Mumbai ) लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. 15 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन ( Death ) झाले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 23, 2023
in देश-विदेश, महाराष्ट्र, मावळकट्टा
Balasaheb-Thackeray-Image

File Image : Balasaheb Thackeray Image By Dainik Maval


शिवसेना पक्षाचे संस्थापक, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा आजच्याच दिवशी म्हणजे 23 जानेवारी 1926 रोजी जन्म झाला होता. ‘एक व्यंगचित्रकार ते महाराष्ट्राच्या राजकारणातील कधीही न शमणारे वादळ’ असा बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास अनेक राजकारण्यांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांमधून आपण तो समजून घेऊयात… ( Maharashtra Shiv Sena Party Founder Shivsena Chief Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Life Journey )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

बाळासाहेब ठाकरे यांच्या 86 वर्षांच्या आयुष्यातील काही महत्वाचे टप्पे

– 1926 : बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील केशव सिताराम ठाकरे म्हणजे प्रबोधनकार ठाकरे हे समाजसुधारक होते.
– 1955 : बाळासाहेबांनी त्यांच्या कारकिर्दीची एक व्यंगचित्रकार म्हणून सुरुवात केली. इंग्रजी वृत्तपत्र द फ्री प्रेस जर्नलमध्ये ते कार्टून रंगवायचे.
– 1960 : बाळासाहेब आणि त्यांचे बंधू श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिक हे राजकीय व्यंगचित्रण करणारे मासिक सुरू केले.
– 19 जून 1966 : “प्रबोधनकार ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना या मराठी भाषकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली.”
– 1984 : शिवसेनेने हिंदूत्व या मुद्द्यावर भाजपासोबत युती केली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी शिवसेनेने भाजपाच्या सहाय्याने मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकली.
– 1989 : बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या वृत्तपत्राची स्थापना केली.
– 1992 : बाबरी मशिदीच्या पाडावाचे बाळासाहेबांनी समर्थन केले.
– 1995 : महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपा युतीचे सरकार आले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री बनले.
– 1996 : बाळासाहेबांचे सुपूत्र बिंदूमाधव ठाकरे यांचे 20 एप्रिल 1996 रोजी मुंबई-नाशिक हायवेवर अपघाती निधन झाले.
– 1999 : निवडणूक आयोगाने बाळासाहेब ठाकरे यांना 6 वर्षांसाठी मतदान करण्यावर बंदी घातली.
– 2004 : उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.
– 2006 : राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्यांनी 9 मार्च 2006 साली स्वतंत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केली.
– 2009 : बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली.
– 2012 : तब्येत खालावल्याने बाळासाहेबांना मुंबईतील लिलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. 15 नोव्हेंबर रोजी बाळासाहेबांना श्वास घेण्यात अडचण येऊ लागली. 17 नोव्हेंबर 2012 रोजी दुपारी 3.30 मिनिटांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. ( Mumbai Shiv Sena Party Founder Shivsena Chief Hindu Hridayasamrat Balasaheb Thackeray Life Journey )

अधिक वाचा –

– मोठी बातमी! शरद पवार यांचा सर्वात जुणा आणि जवळचा सहकारी काळाच्या पडद्याआड
– पवना शिक्षण संकुलात वृक्षारोपण; कार्यक्रमादरम्यान आमदार शेळकेंची खास मागणी आणि मंत्री मुनगंटीवारांचे तात्काळ आश्वासन, वाचा
– मावळ, मुळशीतील नागरिकांसाठी गुडन्यूज! पुणे चक्राकार रस्त्यांसाठी भूसंपादन प्रक्रियेला वेग, वाचा सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस लोणावळा य‍ांना घवघवीत यश; खेळाडूंकडून पदकांची लयलूट

Next Post

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा शुभारंभ, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Uddhav-Thackeray-And-Prakash-Ambedkar-Alliance

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा शुभारंभ, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
Maval beloved Omya passes away Bharat Kesari Omya the bull dies

मावळकरांचा लाडका ‘ओम्या’ काळाच्या पडद्याआड ; बैलगाडाशौकीनांमध्ये दुःखाची लाट, ‘भारतकेसरी ओम्या’ बैलाचे निधन

August 27, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.