मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ‘कार्यकारिणी शिबिर-2023’ रविवारी (दिनांक 22 जानेवारी) रोजी हिरकणी लॉन्स कामशेत येथे संपन्न झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते, रायगड लोकसभेचे खासदार सुनिल तटकरे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे, संपादिका शितल पवार, ओबीसी आरक्षण अभ्यासक हरी नरके, आमदार सुनिल शेळके यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. ( Maval Taluka NCP Party Executive Camp Concluded Here In Kamshet Sunil Tatkare Hari Narke Sunil Shelke Present )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सुनिल तटकरे यांनी यावेळी आमदार सुनिल शेळकेंच्या कार्याचा गौरव केला. तसेच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या संघटनासाठी नेहमीच कार्यरत रहावे, पक्षाची ध्येय-धोरणे तळागाळात पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले. तसेच, अशा प्रकारच्या शिबिरांमुळे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना योग्य मार्गदर्शन मिळुन भविष्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल भक्कमपणे यशस्वीतेकडे अशीच सुरु राहील, असा आशावाद आमदार शेळके यांनी यावेळी व्यक्त केला.
मावळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार @shelkesunilanna अण्णा यांनी देशाचे नेते @PawarSpeaks साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमत्ताने #cadrecamp चे उत्कृष्ट आयोजन केले होते. या शिबिरात मला पक्ष संघटन या विषयावर मनोगत व्यक्त केले. धन्यवाद सुनील अण्णा शेळके ???? @ncpspeaks @AjitPawarSpeaks pic.twitter.com/I6CxS7ob0c
— Ravikant Varpe रविकांत वरपे (@ravikantvarpe) January 23, 2023
सदर कार्यकर्ता शिबिरावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजी अध्यक्ष बबनराव भेगडे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, प्रसिद्ध शाहीर राजेंद्र कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे या मान्यवरांनी विविध विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले. ( Maval Taluka NCP Party Executive Camp Concluded Here In Kamshet Sunil Tatkare Hari Narke Sunil Shelke Present )
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा शुभारंभ, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा
– राष्ट्रीय बेंचप्रेस स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस लोणावळा यांना घवघवीत यश; खेळाडूंकडून पदकांची लयलूट