हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त ( दिनांक 23 जानेवारी) लोणावळा शहर शिवसेना (ठाकरे गट) यांच्यावतीने विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वात आधी लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश गायकवाड, शिवसेना मावळ तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, महिला आघाडी सहसंपर्क संघटीका नगरसेविका श्रीमती शादान चौधरी आणि शहरप्रमुख बाळासाहेब फाटक, शिवसेना अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा संघटक नरेश काळवीट आदी उपस्थित होते. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group Celebrated Balasaheb Thackeray Birth Anniversary In Lonavala City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन…
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्ताने विविध समाजपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरातील गरीब गरजूंना फळे वाटप करण्यात आले. तसेच शिवसेना तुंगार्ली विभागाच्या वतीने उपशहरप्रमुख प्रविण काळे आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुंगार्ली येथील नगरपरिषद शाळेला संगणक संच भेट देण्यात आला. शिवसेना शहर संघटक सुभाष डेनकर यांच्या वतीने नांगरगाव प्रभागातील नागरिकांसाठी ‘मोफत आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित करण्यात आले होते.
तसेच, शिवसेना खंडाळा विभागाच्या वतीने आदिवासी ठाकर वस्ती येथे खाऊवाटप आणि दररोजच्या उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात भजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लोणावळा शहरातील सर्व प्रभागात शिवसेना लोणावळा शहराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. ( Shiv Sena Uddhav Thackeray Group Celebrated Balasaheb Thackeray Birth Anniversary In Lonavala City )
View this post on Instagram
सदर कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नगरसेवक निखिल कविश्वर, नगरसेवक माणिक मराठे, नगरसेवक शिवदास पिल्लै, मा नगरसेवक मधुकर पवार, नगरसेविका सिंधु परदेशी, समन्वयक जयवंत दळवी, उपशहरप्रमुख संजय भोईर, उपशहरप्रमुख मनेष पवार, युवासेना जिल्हा चिटणीस शाम सुतार, युवासेना शहर अधिकारी तानाजी सुर्यवंशी, अवजड वाहतूक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष हेमंत मेने, शिववाहतुक सेना पुणे जिल्हा अध्यक्ष पंकज खोले, सल्लागार रामभाऊ थरकुडे, मा नगरसेवक प्रकाश काळे, शंकर नाणेकर, महिला आघाडी उपतालूका संघटीका संगिता ताई कंधारे, महिला आघाडी उपशहर संघटिका प्रभाताई आकोलकर, सुरेखा देवकर;
प्रतिभा कालेकर, प्रिया पवार, अनिता गायकवाड, विभाग संघटीका सुरेखा केदारी, सीमा दिघे, विभाग प्रमुख भगवान देशमुख, विभाग प्रमुख रविंद्र टाकळकर, विभाग प्रमुख मंगेश येवले, विभाग प्रमुख रतन मराठे, विभाग प्रमुख वसंत ढोरे, विभाग प्रमुख संजय शिंदे, विभाग संघटक शेखर कारके, उपविभाग प्रमुख नितीन काळे, उपशहर अधिकारी ओमकार फाटक, श्रीकांत कंधारे, विभाग संघटक विनोद पिलाणे, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, योगेश गोसावी, शाखाप्रमुख सुनिल मराठे, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे, शाखाप्रमुख अभिषेक इंगुळकर, शाखाप्रमुख संजय जाधव, विजय केदारी, हिंदुराज कोंडभर, उत्तम ठाकर धीरज घारे, अक्षय साबळे, यशवंत मराठे आणि लोणावळा शहरातील सर्व आजी माजी पदाधिकारी नगरसेवक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या पर्वाचा शुभारंभ, शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा
– बाळासाहेब ठाकरे जयंती : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा । Balasaheb Thackeray