व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, July 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा

काही साप असे पण या संशोधनामध्ये आढळून आले की, ते फक्त जंगल भागात आढळून आलेत, लोक वस्ती मध्ये नाही.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 24, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, मावळकट्टा, लोकल, शहर
Snakes-Found-In -Maval-Taluka-Pune

Photo : Nilesh Garade


मावळ तालुक्यात 36 सापांची जात आढळून येतात. यातील कोणते विषारी आणि कोणते बिनविषारी यांचे संशोधन मावळ तालुक्यात राहणाऱ्या जिगर सोलंकी आणि रौनक खरे यांनी आत्माराम आंधळे यांच्या निरिक्षणाखाली पूर्ण केले आहे.

36 जातीमधल्या फक्त 8 साप विषारी आणि त्यातून पण फक्त 4 साप प्रामुख्याने लोक वस्तीमध्ये आढळून येतात. नाग, घोणस, मण्यार, फुरसे हे 4 साप विषारी आहेत आणि बाकीचे 4 दुर्मिळ आहेत आणि ते जंगल भागात आढळून येतात. प्रामुख्याने 4 विषारी सापांमधला कोणताही साप चावल्यास घाबरून न जाता आणि कोणत्याही अफवेला बळी न पडता जवळच्या रूग्णालयात त्वरित जावे आणि योग्य उपचार घ्यावेत.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

उर्वरित सापांमध्ये सगळ्यात जास्त निघणारे बिनविषारी साप आहेत धामण, दिवड, नानेती, कवड्या, तस्कर, गवत्या आणि वाळा हे साप लोक वस्तीमध्ये सर्वात जास्त आढळून येतात. काही झाडांवर राहणारे साप आहेत, जसे की हरणटोळ, मंजऱ्या, रुका हे पण काही ठिकाणी लोक वस्तीमध्ये आढळून येतात. या सापांपासून लोकांना काहीच जीव धोका नाही. साप खाद्य आणि लपायच्या जागा शोधत लोकवस्तीमध्ये येतात. हे साप जास्तकरून उंदीर, बेडूक, पाल, सरडे आणि काही इतर साप असे त्यांचे खाद्य आहे. ( Information About All Types Of Snakes Found In Maval Taluka Pune )

काही साप असे पण या संशोधनामध्ये आढळून आले की, ते फक्त जंगल भागात आढळून आलेत, लोक वस्ती मध्ये नाही. जिगर आणि रौनक यांनी मावळ तालुक्यातील जवळपास सगळ्या भागात सर्व्हे केला आहे. त्यांनी हा सर्व्हे केलाय ज्यातून लोकांमध्ये जनजागृती व्हावी आणि कोणाचीही सर्पदंशाने मृत्यु न व्हावा.

हेही वाचा – माळवाडीत पतंगाच्या मांज्यात अडकलेल्या कबुतराला पक्षीमित्रांकडून जीवदान । Talegaon Dabhade

आपल्या भागात सर्व साप विषारी नाहीत, हे लक्षात ठेवून आपण सावध राहून आपले काम केले पाहिजे. बाहेर फिरताना पायात बुट, रात्री जाताना टॉर्च, जमिनीवर झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या बाजूला कचरा न करावा, घरात किंवा घराच्या बाहेर जे काही बिळे असतील ते सगळे पॅक करावे, अडचण तयार करू नये याची काळजी घ्यावी. ( Snakes Found In Maval Taluka Pune Information Collected By Jigar Solanki And Raunak Khare )

निसर्गाच्या हानीमुळे खूप साप लोकवस्ती कडे येऊ लागले आहेत आणि काही साप दुर्मिळ किंवा नष्ट होत आहेत. सापांची अन्नसाखळीमध्ये खूप मोठी भूमिका आहे. या संशोधन साठी वनविभाग मावळ, वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी संशोधकांना मदत केली. याचे पूर्ण संशोधन cibtech journal of zoology volume 11 या जर्नल मध्ये हे पब्लिश झाले आहे, जे सर्वजन ऑनलाईन पाहू शकतात. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश संपतराव गराडे यांनी ही माहिती दिली.

अधिक वाचा –

– गोडुंब्रेमध्ये रानमांजरीच्या पिल्लांना जीवदान; वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी घडवली आई आणि पिल्लांची भेट
– मावळ तालुका हादरला! मावस भावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस
– लोणावळा परिसरात फिरायला गेलेल्या सलमान खानला लुटले; तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा परिसरात फिरायला गेलेल्या सलमान खानला लुटले; तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Next Post

लोणावळा शहरात शिवसेनेकडून विविध समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती उत्साहात साजरी

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Balasaheb-Thackeray-Birth-Anniversary

लोणावळा शहरात शिवसेनेकडून विविध समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती उत्साहात साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

warkari vari

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर

July 15, 2026
BDO office of Maval Panchayat Samiti locked Aggressive stance of Panchayat Samiti Zilla Parishad members

मावळ पंचायत समितीच्या बीडीओ कार्यालयाला लावले टाळे! पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यांचा आक्रमक पवित्रा

July 15, 2026
Vadgaon residents frustrated by frequent power outages water supply also affected memorandum to Mahavitaran

वारंवार विजपुरवठा खंडित होण्याने वडगावकर हैराण, पाणीपुरवठ्यावरही परिणाम; सत्ताधारी नगरसेवकांचे महावितरणला निवेदन

July 15, 2026
Namaste Day celebrated with enthusiasm by Vadgaon Nagar Panchayat

वडगाव नगरपंचायत तर्फे ‘नमस्ते डे’ उत्साहात साजरा ; स्वच्छता कर्मचारी, कचरा वेचक, ड्रेनेज कामगार यांचे लसीकरण

July 15, 2026
Maval Prabodhini distributes financial aid to victims of the Patan landslide tragedy Ravindra Bhegade helping hand

पाटण दरड दुर्घटनेतील बाधितांना मावळ प्रबोधिनीकडून आर्थिक मदतीचे वाटप; संस्थापक अध्यक्ष रविंद्र भेगडे यांचा मानवतेचा हात

July 15, 2026
MLA Sunil Shelke inspects affected areas in Andar Maval

आमदार सुनील शेळके यांच्याकडून आंदर मावळातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

July 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.