व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 16, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

एकविरा देवी मंदिर परिसराच्या विकासासाठी 40 कोटींचा ‘डीपीआर’, लवकरच निविदा प्रसिद्ध होणार

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 24, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Development-Of-Karla-Ekvira-Devi-Temple

Photo : Twiiter / MP Shrirang Barne


महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (एमएसआरडीसी)च्या माध्यमातून 40 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याबाबतचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्यात नागरिकांच्या सूचनांचाही समावेश केला जाईल. आराखडा पूर्ण होताच निविदा प्रसिद्ध करुन गडावर पाणी, स्वच्छातगृह, वाहनतळ, पाय-या दुरुस्त, दर्शन शेड अशा सुविधा भाविकांना देण्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली. ( 40 Crore DPR For Development Of Karla Ekvira Devi Temple Complex Information Given By MP Shrirang Barane )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

कार्ला गडाच्या विकासासाठी वनविभागाची जागेची आवश्यकता आहे. त्यानुसार खासदार बारणे यांनी आज (मंगळवारी) जिल्हा वनसंरक्षक अधिकारी राहुल पाटील, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) च्या कार्यकारी अभियंता अश्विनी घोडके, सतीश स्रावगे, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह सकाळपासून पाहणी केली. मावळमधील वनविभागाची जागा विकासासाठी देण्यासंदर्भात अधिका-यांना सूचना दिल्या. भाजपचे तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख राजेश खांडभोर, उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, अंकुश देशमुख, सुनील हगवणे, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, मिलींद बोत्रे आदी उपस्थित होते.

हेही वाचा – अरे व्वाह..! आता अवघ्या 3 मिनिटात श्री एकविरा देवीच्या गडावर जाता येणार, वाचा सविस्तर

खासदार बारणे म्हणाले, ”कार्ला गडावर राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात. गडावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह नाही. पाय-यांची दुरावस्था झाली असून वाहनतळाची व्यवस्था नाही. सोयी-सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे भाविकांचे हाल होतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आई एकविरा देवी मंदीर परिसराच्या विकासासाठी एमएसआरडीसीच्या माध्यमातून 40 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्याचा आराखडा तयार केला जात आहे. मंदिर परिसरात वनखात्याची जागा आहे”.

महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी मंदिर विकासासाठी राज्याचे @CMOMaharashtra @DrSEShinde यांनी MSRDC च्या माध्यमातून ४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला या बाबत आज आधिकाऱ्यां समवेत मी एकवीरा देवी पायथा मंदिर परिसराची पाहणी केली. pic.twitter.com/BaOnW7C8Lf

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) January 24, 2023

”भाविकांची वाहने पार्क करण्यासाठी वनखात्याची जागा देण्यास वन विभागाने तत्वता मान्यता दिली. त्यामुळे वाहनतळाची सुविधा होईल. एकविरा देवीकडे जाणा-या पाय-यांची दुरुस्ती केली जाणार आहे. गडावर जाण्यासाठी रोप-वे केला जाणार आहे. त्याचा भाविकांना फायदा होईल. या सुविधा निर्माण करण्यासाठी वन विभागाची जागा घेतली जाणार आहे. वाहनतळ, स्वच्छातगृह उभारणे, भाविकांना सुविधा देण्याचे काम हाती घेतले आहे. छोट्या व्यावसायिकांना वनखात्याच्या जागेत जागा उपलब्ध करुन देण्याची आराखड्यात तरतूद केली आहे. निधी उपलब्ध झाला आहे. लवकरच त्यासंदर्भातील कामाच्या निविदा प्रसिद्ध होतील. आगामी काही दिवसात कामे पूर्ण होतील. एमएसआरडीसीच्या माध्यमातून एकविरा देवी परिसराचा कायापालट होईल”, असेही खासदार बारणे म्हणाले.

अधिक वाचा –

– लोणावळा शहरात शिवसेनेकडून विविध समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती उत्साहात साजरी
– मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरात शिवसेनेकडून विविध समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे बाळासाहेब ठाकरे यांची 97वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

मावळ तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखड्याचे काम हाती, खासदार बारणे यांची माहिती

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MP-Shrirang-Barane

मावळ तालुक्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखड्याचे काम हाती, खासदार बारणे यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala Rural Police bust racket involved in stealing and selling iron worth 16 lakh from construction site

बांधकाम साईटवरील 16 लाख 40 हजार रुपयांचे साडेपंधरा टन लोखंड चोरी करून विकणारे रॅकेट लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून उध्वस्त

October 14, 2026
Organization of various activities in Talegaon Dabhade Municipal Council area under Seva Sankalp Abhiyan 2026

‘नागरिकांची सेवा हाच प्रशासनाचा संकल्प’ : ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रात विविध उपक्रमांचे आयोजन

October 14, 2026
rehabilitation of those displaced by Andra Dam must take place steadfast opposition to enclosed pipeline

आंद्रा धरणग्रस्तांचे पुनर्वसन झालेच पाहिजे ; बंदिस्त जलवाहिनीला कायमचा विरोध!

October 14, 2026
Shekru found in weak state in Vadgaon Maval Forest Range saved released back into wild

Shekaru Rescue : वडगाव वनपरिक्षेत्रात अशक्त अवस्थेत आढळलेल्या ‘शेकरू’ला जीवदान ; निसर्गाच्या सान्निध्यात केले मुक्त

October 13, 2026
Accident

घोरवडेश्वर मंदिर दर्शन करून घरी परतताना काळाचा घाला! सख्ख्या बहिण-भावाचा पुणे-मुंबई महामार्गावर अपघाती मृत्यू

October 13, 2026
Accused arrested after 18 years for murdering his wife Lonavala Police

Lonavala : दारूसाठी पैसे न दिल्याने पत्नीचा खून करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल १८ वर्षांनंतर अटक

October 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.