मावळ तालुक्यातील आजिवली येथील शिवसम्राट प्रतिष्ठान यांचा नववा वर्धापन दिन आणि कार्याध्यक्ष स्व. भाऊ लायगुडे यांच्या स्मरणार्थ आजिवली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मावळचे लोकप्रिय आमदार सुनिल शेळके यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्या हस्ते करण्यात आले होते. सलग नऊ वर्ष आजीवली गावातील तरुण रक्तदानाचा उपक्रम राबवत असल्यामुळे मावळ तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शवली होती. ( Shiv Samrat Pratishthan Anniversary And In Remembrance Let Bhau Laygude Blood Donation Camp At Ajivali Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पवनमावळ विभागातील अत्यंत छोटे आणि दुर्गम खेडे असलेल्या या गावात तब्बल 64 रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. महत्वाचे म्हणजे यावेळी उद्योजक सुधाकर शेळके यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करून स्वतः देखील रक्तदान केले. अजीवली गावात होत असलेल्या या उपक्रमाबाबत बोलताना सुधाकर शेळके म्हणाले की, ‘ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यासाठी महिला आणि पुरुष एकत्र येत आहेत, याचा सार्थ आनंद होतो आहे. आजिवली गावाचा आदर्श आपल्या तालुक्यातील इतर गावांनी देखील घेतला पाहिजे.’
‘रक्तदानासाठी तरुणांनी उभी केलेली ही चळवळ अत्यंत मोलाची आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. अजीवली गावातील हा उपक्रम अत्यंत स्तुत्य उपक्रम असल्याने पुढील काळात आरोग्यविषयक या गावातील कोणती समस्या असल्यास संपूर्ण गावाचे आरोग्य तपासण्या करण्यासाठी गाव जो वेळ देईल त्या वेळेत आम्ही तपासण्या मोफत करून घेऊ,’ असे आश्वासन सुधाकर शेळके यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमासाठी एस.आय. रक्तपेढी पिपंरी चिंचवड यांचे अमूल्य सहकार्य झाले. ( Shiv Samrat Pratishthan Anniversary And In Remembrance Let Bhau Laygude Blood Donation Camp At Ajivali Maval )
यावेळी माजी सभापती निकिता घोटकुले, मावळ तालुका मनसे अध्यक्ष रुपेश म्हाळस्कर, सभापती नंदकुमार धनवे, संभाजी राक्षे, नरेंद्र ठाकर, संतोष कडू, माजी सरपंच सचिन शिंदे, ज्ञानेश्वर डफळ, रामदास गोणते, चेअरमन सचिन संभाजी शिंदे, नवनाथ गोणते, धोंडूभाऊ जाधव, अंकुश लायगुडे, उपसरपंच, छाया गोणते, रुपाली लायगुडे, मुक्ताबाई थोरवे, पोलीस पाटील रुपाली लायगुडे, रोशना गोणते, कल्पना लायगुडे, अनंता महाराज लायगुडे, तानाजी लायगुडे, रवी लायगुडे, गणेश पाटील सर, काझी सर, सुनील केंडे, संभाजी केंडे, दत्ता गोणते, राजू लायगुडे अनिल लायगुडे, महेश लायगुडे, किसन लायगुडे, संभाजी लायगुडे, संतोष लायगुडे, देविदास लायगुडे, मनोज शिंदे, शेखर लायगुडे, निखिल लायगुडे, नारायण केंडे, भरत ओव्हाळ, बबाबाई लायगुडे, बबन शिंदे, पांडुरंग उंबरकर, संतोष केंडे, आनंता केंडे, मधुकर केदारी, शत्रुघ्न लायगुडे, सचिन लायगुडे, रमेश मोरे, रवींद्र उंबरकर, विशाल ओव्हाळ, रोहिदास लायगुडे, नितीन लायगुडे, उत्तम लायगुडे, शंकर जाधव आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी लायगुडे यांनी केले तर आभार अनंता लायगुडे यांनी मानले.
अधिक वाचा –
– मावळच्या दोन तरूणांची जबरदस्त कामगिरी; तालुक्यात आढळणाऱ्या 36 जातीच्या सापांबद्दल शोधनिबंध प्रसिद्ध, नक्की वाचा
– मावळ तालुका हादरला! मावस भावाकडून अल्पवयीन बहिणीचे लैंगिक शोषण, गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस
– पवनानगरमध्ये शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी; विद्यार्थ्यांना खाऊ आणि रुग्णांना फळांचे वाटप