राज्यातील विविध भागात पसरत असलेला पशूधनावरील लम्फी स्कीन ( Lumpy Skin Disease ) या आजाराचा मावळ तालुक्यातही ( Mavala Taluka ) प्रादुर्भाव होत आहे. अगोदर उर्से गावात काही पशूधनांना या आजाराची लागण झाल्यानंतर तालुक्यातील इतरही गावांतील पशूधन लम्फी बाधित झाल्याचे समोर आले. त्यानंतर तालुक्यात लम्फी प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. या सर्व प्रक्रियेचा आढावा आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी घेतला.
पशुधनावरील ‘लम्पी स्किन’ या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि सद्यस्थितीबाबतचा आढावा आमदार सुनिल शेळके यांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. ( Lumpy Disease Maval Taluka Review Meeting Held By MLA Sunil Shelke ) लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुरेशा प्रमाणावर लसी उपलब्ध करण्यात आली असून मावळातील लसीकरण मोहिमेला गती देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व पशुपालकांनी जनावरांचे प्रतिबंधात्मक लसीकरण त्वरित करून घ्यावे, असे आवाहन आमदार शेळकेंनी सर्व शेतकरी बांधवांना केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
जनावरांच्या सुरक्षेसाठी वेळेवर उपचार मिळणे आवश्यक आहे. आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात व खबरदारी घेण्यासंदर्भातील माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन द्यावी व विविध माध्यमातून जनजागृती करावी. पशुपालकांना योग्य मार्गदर्शन करावे, अशा सुचना यावेळी आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या बैठकीला आमदार सुनिल शेळके यांच्यासमवेत गटविकास अधिकारी सुधीर भागवत, पशुधन विकास अधिकारी डॉ. ए. पी. देशपांडे, डॉ. अनिल परंडवाल, डॉ. रुपाली दडके, डॉ. अजय सुपे, डॉ. नितीन मगर, पशुधन पर्यवेक्षक दिपक राक्षे, शिकलगार यासीन, श्रीमती सीमा वाघमारे, डोबले आणि इतर अधिकारी उपस्थित होते. ( Lumpy Skin Disease Maval Taluka Review Meeting Held By MLA Sunil Shelke )
अधिक वाचा –
लम्फी आजाराचा प्रादुर्भाव : कार्ला येथे 130 पशुधनाचे प्रतिबंधात्मक लसीकरण
लम्पी स्कीन : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लशी उपलब्ध