‘संस्कारक्षम माणूस हा संगतीमधूनच घडत असतो. म्हणून चांगले आचरण असलेल्या मित्रांच्या, लोकांच्या संगतीत राहावे. आपल्या कर्तृत्वाने मोठे व्हावे. टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देखील देवपण येत नाही. तुम्ही आम्ही तर माणूस आहोत. प्रयत्नांशिवाय काहीही मिळणार नाही, म्हणून नेहमी प्रयत्नशील राहा,’ असे मार्गदर्शन गणेश महाराज जांभळे यांनी केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रियदर्शनी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. दिलीपभाऊ टाटीया यांच्या पुण्यतिथी निमित्त वरसुबाई माध्यमिक विद्यालय, माळेगाव बुद्रुक (ता. मावळ, जि. पुणे) इथे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. गणेश महाराज जांभळे यांनी केलेल्या सुश्राव्य व्याख्यानाने सर्व श्रोते मंत्रमुग्ध झाले. ( Ganesh Jambhale Lecture At Varsubai School Malegaon Budruk Maval On Occasion Of Dilipbhau Tatia Death Anniversary )
प्रियदर्शनी एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष स्व. दिलीपभाऊ टाटीया यांची पुण्यतिथी निमित्ताने वरसुबाई माध्यमिक विद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वप्रथम स्व. दिलीपभाऊ टाटीया यांचे प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी माजी सभापती शंकरराव सुपे, सचिव पोपट बाफना, राजूशेठ बेदमुथा, हभप गणेश महाराज जांभळे, दशरथ दगडे, गबळू लांघी, केंद्रप्रमूख मधूकर गंभीरे, शितल दंडवते, शिवकांता गिते आदी मान्यवर, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि शिक्षकवृंद उपस्थित होता.
अधिक वाचा –
– श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीची 2023-24 ची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी प्रणव भेगडे
– किल्ले लोहगडावर महाशिवरात्र जल्लोषात साजरी! पंचक्रोशीतील नागरिकांनी केलेल्या शिवघोषाने दुमदुमला परिसर