भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा ग्रामीण पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक महाराष्ट्र भाजपा कार्यालय संपर्क प्रमुख रवि अनासपुरे आणि जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा पुणे जिल्हा ग्रामीण कार्यालय येथे पार पडली. यावेळी मावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी उपस्थित राहून भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्यातील संघटनात्मक कार्याचा आढावा दिला.
या वेळी आगामी निवडणूका आणि संघटनात्मक बांधणी यावर विस्तृत चर्चाही झाली. या बैठकीला जिल्हा सरचिटणीस ॲड. धर्मेंद्र खाडरे, अविनाश बवरे, पुणे जिल्हा महिला मोर्चा समन्वयक स्वाती शिंदे, तळेगाव शहर भाजपा अध्यक्ष रवींद्र माने, सोशल मिडिया अध्यक्ष सागर शिंदे यांच्यासह मावळ तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. ( In presence of Ravi Anaspure review meeting of Pune BJP rural office bearers was concluded )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– नेते हो..! तुम्ही तरी कितीवेळा चिखल तुडवत येणार, रस्त्याचं मनावर घ्या अन् पुढच्यावेळी चारचाकीत बसून मत मागायला या
– माजी विद्यार्थ्यांनी शब्द पाळला, पवना विद्या मंदिर शाळेतील सभागृह बांधणीसाठी मोठी मदतराशी शाळेकडे सुपूर्द