पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेतील मार्च 1977, मार्च 1982 या बॅच मधील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शाळेच्या उभारणासाठी मोठी मदत केली आहे. मागील आठवड्यात माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत सभागृहाचे भूमीपूजन संपन्न झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेच्या या सभागृह उभारणीसाठी भरीव देणगी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगितले होते. ( Pavana Vidya Mandir School Pavananagar Financial Help From Former Students To Build Auditorium )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्या दिवशी दिलेल्या शब्दानुसार आता प्रत्यक्ष धनादेश संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, पर्यवेक्षिका निला केसकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. माजी विद्यार्थ्यांनी सभागृहसाठी 16501 रुपयांची मदत केली. यावेळी शाळेचे 1977, 1982 बॅचचे विद्यार्थी नितीन देशमुख, शरद चाफेकर आणि कडधे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणेश कदम तसेच शाळेचे जेष्ठ अध्यापक राजकुमार वरघडे, भारत काळे, संजय हुलावळे, गणेश ठोंबरे, संतोष ठाकर, संजीवन वाघे आणि इतर उपस्थित होते.
अधिक वाचा –
– तुंगार्लीतील श्री जाखमाता देवी उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सुनील तावरे, पाहा समितीची पूर्ण यादी
– मोठी बातमी! चिंचवडमध्ये मतदान केंद्राबाहेर राडा
– वृद्ध जोडप्यांना लक्ष्य करुन दरोडा टाकणारी टोळी गजाआड, पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेची कौतुकास्पद कारवाई