मंचर आणि पारगाव हद्दीत वृद्ध दाम्पत्यांना लक्ष्य करून रात्रीच्या वेळी घरात घुसून लूटमार करून दरोडा टाकणाऱ्या चार अट्टल दरोडेखोरांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. संगमनेर तालुक्यातून सदर आरोपी ताब्यात घेत पुणे ग्रामीण च्या ( Pune Rural Police ) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे.
मंचर पोलिस ठाण्यात भादवि कलम 392, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 8 फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंचर हद्दीत थोरांदळे येथील फिर्यादी नामे चिकणाबाई मिंडे (वय 72 वर्षे) यांच्या घरात घुसून त्यांना आणि त्यांच्या पतीला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने तसेच रोख रक्कम बळजबरीने काढून घेऊन पसार झाले होते.
या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू असतानाच दिनांक 16 फेब्रुवारी 2023 रोजी पारगाव पोलीस स्टेशन हद्दीत धामणी या गावात रात्री अकराच्या सुमारास गोविंद फगवंत जाधव (वय 82 वर्षे) यांच्या घरात अनोळखी माणसांनी घुसून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतल्याची घटना समोर आली. सदर बाबत पारगाव पोलिस ठाण्यात भादवि कलम 394, 457, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ( Four Robbers Jailed For Robbing Elderly Couple In Manchar Pargaon Area Pune Rural Police )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
एका मागून एक झालेल्या दोन गंभीर प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सदर गुन्हा लवकरात लवकर उघड करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर गुन्ह्यांच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी भेटी देऊन गुन्हे शाखेचे पथक तयार केले. पथकामध्ये सपोनि शेलार, पोहवा साबळे, पोहवा मोमीन, पोना वारे, पोकॉ अक्षय नवले, दगडू विरकर यांचा समावेश होता. सदर पथकाने लागलीच आरोपींचा शोध सुरू केला.
गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदार यांच्या मार्फतीने बातमी मिळाली की सदर गुन्ह्यामध्ये दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर येथील आकाश पांडुरंग फड नावाचा व्यक्ती असण्याची शक्यता आहे. मिळलेल्या बातमी नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने दरेवाडी भागात सापळा लावून आकाश फड याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सदर गुन्ह्यांची चौकशी केली असता त्याने दोन्ही ठिकाणचे गुन्हे त्याचे इतर चार साथीदार नामे 1) रवींद्र भाऊसाहेब फड (वय 30 रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अहमदनगर) 2) वैभव दिगंबर नागरे (वय 20 रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर) 3) अतिष बाळासाहेब बडवे (वय 23 रा. पिंपरी लौकी ता. संगमनेर जि. अ नगर) 4) नंदकुमार पवार (वय 21 रा. दरेवाडी ता. संगमनेर जि. अ नगर) यांच्या मदतीने केल्याची कबुली दिली.
हेही वाचा – ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल
यातील आरोपी नामे रवींद्र भाऊसाहेब फड हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. तसेच आरोपी नामे नंदकुमार पवार याला पारगाव पोलीस स्टेशन च्या ताब्यात आणि बाकीचे आरोपी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहेत. सदर आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी मंचर पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि महादेव शेलार, पोसई. गणेश जगदाळे, पोहवा दिपक साबळे, पोहवा. राजू मोमीन, पो. ना. संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, पो.कॉ. निलेश सुपेकर, पो. कॉ.दगडू वीरकर यांनी केली आहे.
अधिक वाचा –
– मोठी कारवाई! कसबा पेठ मतदारसंघात भरारी पथकाकडून 28 लाखांची रोकड जप्त
– गाडी पार्क करण्यावरुन वाद, तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल