कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून प्रशासनाने आतापर्यंत 13 हजार 542 वाहनांची तपासणी केली. यात नाके तपासणी आणि भरारी पथकांच्या तपासणीत एकूण 5 घटनांमध्ये 28 लाख 18 हजार 500 रुपये इतकी रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे. ही रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात आली आहे. ( Kasba Peth And Chinchwad Assembly By Elections Cash Seized By Bharari Teams In Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कसबा पेठ विधानसभा पोट निवडणूकीच्या प्रचारास शुक्रवार (24 फेब्रुवारी) सायंकाळी 6 वाजल्यापासून प्रतिबंध आहेत. पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली असून नाके तपासणी आणखीन कडक करण्याचे नियोजन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रचार समाप्ती नंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत, असे कसबा पेठ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांनी सांगितले आहे.
चिंचवडच्या दळवीनगर भागात पुन्हा रोकड जप्त….
कसबा पेठ प्रमाणेच चिंचवडमध्येही 14 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे चिंचवडच्या दळवीनगरमध्ये ही रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे, जिथे काही दिवसांपुर्वीच 43 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती.
अधिक वाचा –
– कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक : मतदानापूर्वी तसेच मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्रीस बंदी, वाचा संपूर्ण आदेश
– मोठी बातमी! औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्र सरकारची मंजूरी, शिंदे-फडणवीस सरकारला मोठे यश