व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, July 22, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावात एकाच दिवशी तीन ठिकाणी आगीच्या घटना ; जीवाची पर्वा न करता आग विझविणाऱ्या जवानांचा सन्मान

सर्व घटनांमध्ये अग्निशामक दलाने दाखवलेली तत्परता आणि धाडस यामुळे मोठा अनर्थ टळला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 17, 2026
in लोकल, शहर
Three fire incidents in Talegaon on same day soldiers who put out fire without risking their lives

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वाढत्या उष्णतेचा तडाखा, तर काही ठिकाणी नागरिकांच्या निष्काळजीपणाचा परिणाम म्हणून तळेगाव दाभाडे शहरात एका दिवसात चार वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. परंतु, या सर्व घटनांमध्ये अग्निशामक दलाने दाखवलेली तत्परता आणि धाडस यामुळे मोठा अनर्थ टळला.

पहिली घटना –
शहरातील एका बंद घरात अचानक आग लागल्याची घटना समोर आली. घर बंद असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली होती. अशा वेळी अग्निशामक दलाने वेळ न दवडता दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि शिताफीने आगीवर नियंत्रण मिळवले. या कारवाईमुळे मोठे नुकसान टळले.

दुसरी घटना –
शहरातील दोन ठिकाणी वाळलेल्या गवताला लागलेल्या आगी काही क्षणांत वेगाने पसरत होत्या. मात्र, अग्निशामक कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अल्पावधीतच या आगी आटोक्यात आणल्या. त्यामुळे संभाव्य मोठा धोका टळला.

तिसरी घटना –
तळेगाव-चाकण महामार्गावरील भारत पेट्रोलियमजवळ उभ्या असलेल्या डिझेल टँकरला अचानक आग लागल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. स्फोटाचा धोका लक्षात घेता परिस्थिती अत्यंत संवेदनशील होती. मात्र, अग्निशामक दलाने जीवाची पर्वा न करता अथक प्रयत्न करत ही भीषण आग विझवली आणि मोठा अनर्थ टाळला.

दरम्यान या धाडसी कार्याबद्दल तळेगाव दाभाडे नगरपरिषद अग्निशामक दलातील अधिकारी संतोष तेलगे व कर्मचारी निरंजन भेगडे, अनुपम सिंग, शुभम काळोखे, अक्षय घोडेकर, ओम भेगडे, आकाश ओव्हाळ, शेखर खोमणे, भास्कर माळी आणि बाळू ठाकर यांचा नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील), मुख्याधिकारी गिरीश दापकेकर तसेच नगरसेवकांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान 


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे शहरात प्लॅस्टिक जप्तीची कारवाई, १४७ किलो प्लॅस्टिक जप्त ; सिंगल युज प्लॅस्टिक वापरणाऱ्या दुकानदारांवर २५ हजारांचा दंड

Next Post

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Land purchase and sale transactions for proposed MIDCs at Baur, Karunj, Brahmanwadi in Maval temporarily closed

प्रस्तावित एमआयडीसीला करुंज, बऊर, ब्राह्मणवाडी येथील स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध कायम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lonavala world-famous Lonavala Chikki receives GI Tag century-old tradition gains global recognition

लोणावळा येथील जगप्रसिद्ध “लोणावळा चिक्की”ला ‘जीआय टॅग’ ; शतकभराच्या परंपरेला मिळाली जागतिक ओळख

July 20, 2026
Tourist-Places-Maval-Taluka

रिमझिम पावसाने मावळचा निसर्ग फुलला ; निर्बंध हटल्यामुळे पवना, लोणावळा परिसरात पर्यटकांची तोबा गर्दी

July 20, 2026
Agony even after death corpse suffers indignity due to lack of cremation ground in Maval Ardav village

मरणानंतरही नशिबी यातनाच ; मावळच्या आर्डव गावात स्मशानभूमी अभावी मृतदेहाची हेळसांड

July 18, 2026
non-venomous Gajara snake Indian Smooth Snake considered extremely rare found at Kanhe Maval

मावळमधील कान्हे येथे आढळला अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा बिनविषारी गजरा साप (इंडियन स्मूथ स्नेक)

July 17, 2026
Work begins on Namo Udyan in Talegaon Dabhade groundbreaking ceremony in presence MLA Sunil Shelke

तळेगावच्या पंचवटी कॉलनीत ‘नमो उद्यान’ साकारण्यास प्रारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत भूमिपूजन

July 17, 2026
Paying tribute at memorial pillar on occasion death anniversary of late Umeshbhai Shetty Lonavala Shiv Sena

Lonavala : शिवसेना मावळ तालुका संस्थापक कै. उमेशभाई शेट्टी यांच्या ४० व्या पुण्यतिथीनिमित्त स्मृतीस्तंभास अभिवादन

July 17, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.