Dainik Maval News : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेकडून सिंगल-यूज प्लास्टिकविरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून शहरातील प्रमुख व्यापारी भागांत धडक तपासणी मोहीम राबविण्यात आली. मुख्याधिकारी गिरीश दापकेकर व आरोग्य सभापती निखिल भगत यांच्या सूचनेनुसार प्लास्टिक बंदी पथकाने तळेगाव स्टेशन परिसरात तपासणी केली. यावेळी चाकण रोड व वराळे रोड परिसरातील घाऊक दुकानांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.
तपासणीदरम्यान गणेश ट्रेडर्स (चाकण रोड), आशापुरात ट्रेडर्स आणि भवानी ट्रेडर्स (वराळे रोड) या दुकानांमध्ये सिंगल-यूज प्लास्टिक कॅरीबॅग मोठ्या प्रमाणात आढळून आल्या. नियमांचे उल्लंघन केल्यामुळे संबंधित दुकानांमधून एकूण सुमारे १४७ किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही कारवाई पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात असून व्यापाऱ्यांना प्लास्टिक बंदीचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगर परिषदेकडून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. यामध्ये पुनरावृत्ती झालेल्या दोन दुकानांवर प्रत्येकी १० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, तर भवानी ट्रेडर्स या दुकानावर प्रथमच उल्लंघन आढळल्यामुळे ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. अशा प्रकारे एकूण २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, भविष्यात अशा प्रकारचे उल्लंघन आढळल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल.
ही मोहीम नगराध्यक्ष संतोष दाभाडे (पाटील), आरोग्य सभापती निखिल भगत व मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. कारवाईत पाणीपुरवठा अभियंता अभिषेक शिंदे, स्वच्छता निरीक्षक प्रशांत शिवणे, सुनील काळकुटे.चालक संतोष दाभाडे. अंकुश जाधव. तसेच अतिक्रमण पथकातील कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग होता.
नगर परिषदेकडून नागरिक व व्यापाऱ्यांना पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले असून प्लास्टिकमुक्त शहर घडविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान