शुल्लक कारणातूनही लहान मोठे गुन्हे घडण्याच्या घटना अलिकडे वाढताना दिसत आहे. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (22 फेब्रुवारी) रोजी दुचाकी पार्क करण्याच्या किरकोळ कारणातून झालेल्या वादात एका तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. ( Youth Beaten Due To Dispute Over Bike Parking Case Registered In Dehu Road Police Station )
सदर प्रकरणी फिर्यादी करण बलराज कागडा (वय 26, व्या. – मजुरी, रा. पारशीचाळ, वाल्मीक मंदीरजवळ देहूरोड) याने देहूरोड पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी संदीप दिलबाग बोत (वय 35, रा. पारशीचाळ वाल्मिक मंदीर जवळ देहूरोड, पुणे) याच्या विरोधात देहुरोड पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 324, 504 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 22 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 12 ते सव्वा बाराच्या दरम्यान पारशीचाळ, वाल्मीक मंदीर जवळ देहूरोड इथे हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणी बुधवार रोजी (22 फेब्रुवारी) रात्री सव्वा दहाच्या सुमारास देहुरोड पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली. घटनेतील आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
हेही वाचा – ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करण बलराज कागडा हे घरात हजर असताना फिर्यादी यांचा लहान भाऊ राहुल हा मोटार सायकल घेऊन घरी आला आणि वाल्मीक मंदिराचे बाजूला मोटार सायकल (क्रमांक एम.एच. 14 जे.जी. 2113) पार्क करून घरात येत होता. तेव्हा आरोपी संदीप दिलबाग बोत याच्या सोबत मोटार सायकल लावण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने फिर्यादी करण कागडा यांच्या भावाला डोक्यावर मारहाण केली गेली. तसेच यात भावाच्या डोक्याला आणि पाठीला जखम झाली, असे फिर्यादीत नमुद आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक थिटे हे करत आहेत. ( Youth Beaten Due To Dispute Over Bike Parking Case Registered In Dehu Road Police Station )
अधिक वाचा –
– दुचाकीस्वाराला धडक देत गंभीर जखमी करुन चारचाकी चालक फरार; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार
– सहप्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime