तळेगाव दाभाडे शहरातील तळेगाव-चाकण रोडवर असलेल्या नुतन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकी चालकाला भरधाव वेगात आलेल्या चारचाकी चालकाने धडक देत गंभीर जखमी करुन घटनास्थळावरुन पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार फिर्यादी रघुनाथ धावजी बगाड (वय 40) यांनी तळेगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानुसार, क्रेटा गाडी क्रमांक एम.एच. 14 जे.ई. 4496 याच्या चालकाविरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 279, 337, 338, 427 सह मो.वा.का. 134, 177, 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री दोनच्या सुमारास नुतन कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ तळेगाव-चाकण रोडवर तळेगाव दाभाडे इथे हा प्रकार घडला. या प्रकरणी बुधवारी (दिनांक 22 फेब्रुवारी) फिर्याद दाखल करण्यात आली. ( Four Wheeler Driver Absconded After Hitting Biker And Seriously Injured Him Shocking Incident In Talegaon Dabhade Case Registered )
हेही वाचा – श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ निवडणूक, लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रुट मार्च – व्हिडिओ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल देविदास शेलार याच्या ताब्यातील मोटास सायकल (क्रमांक एम.एच 14 ई.के. 8861) हिला समोरून येणाऱ्या काळ्या रंगाच्या क्रेटा गाडी (क्रमांक एम.एच. 14 जे.ई. 4496) या गाडीच्या चालकाने जोरदार धडक दिली. भरधाव वेगाने निष्काळजीपणे क्रेटा गाडी चालवून विशाल देविदास शेलार यास गंभीर जखमी केले. तसेच मोटार सायकल आणि क्रेटा गाडी या दोन्ही गाड्याचे नुकसान झाले, या अपघातास कारणीभूत झाल्याप्रकरणी तसेच घटनेबाबत कोणतीही माहीती न देता जखमीला तसेच ठेवून सदर ठिकाणाहून चालकाने पळ काढला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरिक्षक मदेवाड हे करत आहेत.
अधिक वाचा –
– सहप्रवासी महिलेचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात शिरगाव पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime
– ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल