मावळ तालुक्यातील ( Maval News ) कुसवली गावात सामाजिक सुरक्षा योजना जाणीव जागृती पाठपुरावा कार्यक्रम आणि शासकीय योजना शिबिर ग्रामस्थांच्या सहभागाने मोठ्या उत्साहात संपन्न झाले. दिनांक 23 फेब्रुवारी 2023 रोजी हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे आणि पोस्ट ऑफीस व सहासंखा (सीएसआर) यांच्यामार्फत हे शिबिर घेण्यात आले. ( Public Awareness Program Regarding Government Schemes In Kusavli Village Of Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामीण भागातील अनेक नागरिक केंद्र आणि राज्य शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांबाबत पुरेशी माहिती नसल्यामुळे पात्र असूनही योजनांचे लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामार्फत पात्र लाभार्थ्यांना अशा विविध योजनांचे लाभ मिळवून देणे हा या सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
कुसवली गावातील सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती पाठपुरावा कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, अटल पेन्शन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना, ई-श्रम कार्ड, सुकन्या समृध्दी योजना, स्कॉलरशिप, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, इत्यादी विवीध योजनाची माहिती नागरिकांना देण्यात आली. ( Public Awareness Program Regarding Government Schemes In Kusavli Village Of Maval Taluka )
हेही वाचा – तुंग गावात समुदाय केंद्राचे उद्धघाटन; हॅन्ड इन हॅन्ड संस्थेकडून सर्व वयोगटातील नागरिकांसाठी पुस्तके उपलब्ध
तसेच कार्यक्रमाला उपस्थितीत नागरिकांची श्रम कार्ड, आभा कार्ड, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना इत्यादी योजनांची नोंदणी करण्यात आली. सदर सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती कार्यक्रमामध्ये गावातील 33 नागरिकांनी उपस्थिती नोंदवली. त्यासोबत गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोस्टमन, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. सामाजिक सुरक्षा जाणीव जागृती पाठपुरावा कार्यक्रमास हॅण्ड इन हॅण्ड इंडिया संस्था प्रतिनिधी मिनाक्षी सुधीर कुडे उपस्थित होत्या. संस्थेकडून मिनाक्षी सुधीर कुडे यांनी गावचे सरपंच, उपसरपंच, पोस्टमन आणि ग्रामस्थांचे आभार मानले.
अधिक वाचा –
– वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम; कुसगाव बुद्रुक इथे सवलतीच्या दरात गरजूंना श्रवणयंत्र वाटप
– दुचाकीस्वाराला धडक देत गंभीर जखमी करुन चारचाकी चालक फरार; तळेगाव दाभाडेतील धक्कादायक प्रकार