भारतीय लोकशाहीचा कणा असलेली व्यवस्था म्हणजे पंचायतराज. या पंचायतराजच्या केंद्रस्थानी असतं ते खेडे आणि तेथील ग्रामपंचायत. याच ग्रामपंचायतचा कारभार पाहणारे कारभारी म्हणजेच सरपंच आणि ग्रामसदस्य. महाराष्ट्रच नव्हे तर देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीत निवडूण येणारे सदस्य, सरपंच हे प्रशिक्षित असतातच असे नाही. मात्र, ग्रामविकासाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते. म्हणूनच अशा सर्व लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याचे कार्य महाराष्ट्रात यशदा अर्थात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन संस्था या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. ( Dainik Maval Special Article on Lecturer Vivek Gurav Who Gave Lessons On oratory Skills Through YASHADA Sanstha )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
ग्रामपंचायतवर निवडून जाणाऱ्या सदस्यांना अनेक कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असतं किंवा त्यांच्याकडे ती असायला हवीत. अशा कौशल्यांमध्ये वकृत्व ही देखील अत्यंत महत्वाची बाब आहे. विचार फक्त असून चालत नाही, तर ते मांडता देखील आले पाहिजे. यासाठी वक्तृत्व हे लोकप्रतिनिधींना जमले पाहिजे, यासाठीच यशदाकडून अशा सर्व सदस्यांना वक्तृत्वाचेही धडे दिले जातात आणि ‘विवेक गोविंदराव गुरव’ हे या पायरीवर प्रत्येक नवनिर्वाचित सदस्यासाठी द्रौणाचार्य आहेत.
महाराष्ट्रात नव्याने निवडून आलेलल्या लोकनियुक्त सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि लोकप्रतिनिधी म्हणून भाषण कौशल्य अवगत करण्यासाठी यशदाच्या माध्यामातून जे प्रयत्न केले जातात, त्यात मास्टर ट्रेनर व्याख्याते म्हणून विवेक गोविंदराव गुरव यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातील 8 हजारहून अधिक सरपंच, ग्रामसदस्य यांना भाषण कौशल्य विषयावर व्याख्यान दिले आहे.
यासह त्यांनी विविध विषयांवर राज्यभर 5 हजारांपेक्षा जास्त व्याख्याने दिली आहेत. ज्ञानविकास विकास प्रबोधिनी या संस्थेमार्फत मावळ, मुळशी, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हा मधील राजकीय क्षेत्रातील नगराध्यक्ष, नगरसेवक, नगरसेविका, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत सदस्य, सभापती इत्यादी 3 हजारपेक्षा जास्त लोकप्रतिनिधींना त्यांनी स्टेज डेरिंग क्लासेसच्या माध्यमातून हक्काचे व्यासपीठ तयार करून दिले आहेत.
विवेक गुरव यांना आजवर मिळालेले पुरस्कार…
विवेक गुरव यांना आतापर्यंत विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यात आठ राज्यस्तरीय पुरस्कार आणि एका राष्ट्रीय सरस्वती विद्यारन्त पुरस्कार याचा समावेश आहे. यासह मावळ भुषण, मावळ रन्त, आदर्श व्याख्याता, समाजभूषण असे अनेक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मागील 15 वर्षांपासून आवडीचे क्षेत्र निवडून विवेक गुरव व्याख्यानाचा प्रवास करीत आहेत. ( Dainik Maval Special Article on Lecturer Vivek Gurav Who Gave Lessons On oratory Skills Through YASHADA Sanstha )
अधिक वाचा –
– गुडन्यूज! शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबतच जानेवारीचे धान्य, मोबाईल क्रमांक जोडण्याचेही आवाहन
– क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माऊ गावातील गरीब कुटुंबाचा संसार जळून खाक