मावळ तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आंदर मावळ भागातील माऊ गावातील रहिवासी संतु नथू चव्हाण यांचे राहते घर अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाले आहे. क्षणार्धात घडलेल्या या घटनेने या गरीब कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. ( Damage to house due to short circuit fire Incident at Mau village in Maval taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्राप्त माहितीनुसार, मौजे माऊ (तालुका मावळ, जिल्हा पुणे) येथील संतु नथू चव्हाण यांच्या राहत्या घराला दिनांक 21 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री अंदाजे साडेआठच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानकपणे आग लागली. या आगीत कुठलीही जिवितहानी झालेली नाही. परंतू अचानक लागलेल्या आगीत संतु चव्हाण यांच्या राहत्या घराचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यासह घरातील इतर जीवनावश्यक व घरगुती वस्तू आणि महत्त्वाची कागदपत्रे यांचे नुकसान झाले आहे. सदर वस्तू व कागदपत्रे लागलेल्या आगीत जळून नष्ट झालेले आहेत. याबाबत उपस्थित पंचानी केलेल्या पंचनाम्यानुसार चव्हाण यांचे अंदाजे 4 लाख 16 हजार इतक्या रकमेचे नुकसान झाले आहे. या अचानक ओढावलेल्या संकटाने माऊ गावातील हे गरीब कुटुंब अक्षरशः उध्वस्त झाले असून समाजातील दानशूर व्यक्ती, लोकप्रतिनिधी आणी सरकारकडून त्यांना मदतीची आता अपेक्षा आहे.
अधिक वाचा –
– ‘मनरेगा’तून उभारले सार्वजनिक गोदाम, मावळमधील ‘आढे पॅटर्न’ची जिल्ह्यात चर्चा, आमदार-खासदार यांच्या हस्ते उद्घाटन
– श्री डोळसनाथ महाराज उत्सव समितीची 2023-24 ची कार्यकारिणी जाहीर, अध्यक्षपदी प्रणव भेगडे
– ‘संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो’, वरसुबाई माध्यमिक विद्यालयात गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य व्याख्यान