मावळ तालुक्यातील आढे गावातील सार्वजनिक गोदाम आणि विविध विकासकामांचा उद्घाटन समारंभ मंगळवारी (दिनांक 21 फेब्रुवारी) रोजी संपन्न झाला. आमदार सुनिल शेळके, खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह इतर अनेक मान्यवर, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सार्वजनिक गोदाम उभारणीचा हा पहिलाच प्रकल्प असून ‘आढे पॅटर्न’ म्हणून भविष्यात नक्कीच आदर्शवत ठरेल, असे गौरवोद्गार आमदार सुनिल शेळकेंनी यावेळी मनोगत व्यक्त करताना काढले. ( Construction of Public Godown Under MGNREGA In Adhe Village Maval Inauguration By MLA Sunil Shelke MP Srirang Barane )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या कार्यक्रमाला मावळचे आमदार, खासदार यांसह पुणे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, माजी सभापती बाबुराव वायकर, जेष्ठ नेते भास्कर म्हाळसकर, दिपक हुलावळे, शांताराम भोते, राजु खांडभोर, भरतभाऊ भोते, रा.काँ. तालुकाध्यक्षा दिपाली गराडे, सरपंच सुनिताताई सुतार, उपसरपंच बाबा हिंगडे, सर्व सदस्य, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, संताजी जाधव आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक वाचा –
– ‘संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो’, वरसुबाई माध्यमिक विद्यालयात गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य व्याख्यान
– गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय