महाराष्ट्र राज्य मंत्रिमडळाची महत्वाची बैठक आज (बुधवार, 22 फेब्रुवारी) मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रमुख मंत्री, अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्वाचे निर्णय घेतले.
गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 1 कोटी 63 लाख शिधा पत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. यापुर्वी दिवाळीतही शिंदे-फडणवीस सरकारने गरीब जनतेसाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला होता. यासह इतरही अनेक महत्वाचे निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत. ( Anandacha Shidha Ration In Hundred Rupees For Poor People Maharashtra Shinde Fadanvis Government Big Decisions In Cabinet Meeting )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
#मंत्रिमंडळनिर्णय
✅ अकोले तालुक्यातील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देणार. ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता. ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ✅ गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १०० रुपयांत आनंदाचा शिधा. १ कोटी ६३ लाख शिधापत्रिका धारकांना लाभ
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 22, 2023
अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांना 1 किलो रवा, 1 किलो चनाडाळ, 1 किलो साखर आणि 1 लिटर पामतेल असा आनंदाचा शिधा गुढी पाडव्यापासून पुढील 1 महिन्याच्या कालावधीसाठी ई-पॉसद्धारे 100 रुपये प्रतिसंच असा सवलतीच्या दरात दिला जाईल. ई-पॉसची व्यवस्था नसलेल्या ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने हा शिधा दिला जाईल.
हा आनंदाचा शिधा देण्याकरिता आवश्यक शिधा जिन्नसांची खरेदी करण्याकरिता महाटेंडर्स या ऑनलाईन पोर्टलद्धारे 21 दिवसांऐवजी 15 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. 2022 मध्ये दिवाळी सणानिमित्त शिधाजिन्नस खरेदीसाठी पार पडलेल्या निविदा प्रक्रियेत 279 प्रति संच या दरानुसार 455 कोटी 94 लाख आणि इतर अनुषंगीक खर्चासाठी 17 कोटी 64 लाख अशा 473 कोटी 58 लाख इतक्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली.
अधिक वाचा –
– पोटनिवडणुकीत झोकून देवून काम करा, एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश
– चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत मुख्यमंत्री शिंदेंची एन्ट्री, बुधवारी रोड शोसह होणार जाहीर सभा, वाचा अधिक