व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पोटनिवडणुकीत झोकून देवून काम करा, एकनाथ शिंदे यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांना आदेश

सर्व कामे बाजूला ठेवून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारी) शिवसेनेच्या पदाधिका-यांना दिल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 22, 2023
in महाराष्ट्र, ग्रामीण, पुणे, शहर
CM-Eknath-Shinde

Photo Courtesy : MP Shrirang Barne


चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांना निवडून आणण्यासाठी झोकून देवून काम करावे. प्रचाराला केवळ तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (21 फेब्रुवारी) शिवसेनेच्या पदाधिका-यांना दिल्या.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचाराचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. त्यांनी शहरातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिका-यांच्या गाठीभेटी घेतल्या. मुख्यमंत्र्यांसोबत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, शिवसेनेचे विधीमंडळातील प्रतोद भरत गोगावले, शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते. ( Chief Minister Eknath Shinde Guidance To Shiv Sena Party Workers In Chinchwad Assembly By Election )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

थेरगाव येथे पदाधिका-यांची बैठक घेतली. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, उपजिल्हाप्रमुख राजेश वाबळे, मावळचे जिल्हा संघटक अंकुश देशमुख, पिंपरी-चिंचवचे शहरप्रमुख निलेश तरस, जिल्हा संघटिका शैला पाचपुते, युवती संघटिका शर्वरी गावंडे, उपशहर प्रमुख बशीर सुतार, पिंपरी विधानसभा प्रमुख रुपेश कदम, चिंचवड विधानसभा प्रमुख सुरेश राक्षे, शहर संघटक सोमनाथ गुजर, रवींद्र ब्रह्मे, हाजी शेख, पिंपरी विधानसभा संघटक नरेश टेकाडे, संदीप पवार, निखील यवले, समन्वयक सुनील पाथरमल, चिंचवड विधानसभा संघटक रोहिदास दांगट, संतोष बारणे, सुदर्शन देसले, समन्वयक प्रदीप दळवी, उपविधानसभा संघटक राजेश अडसूळ, अंकुश कोळेकर, प्रशांत कडलग, महेश कलाल उपस्थित होते.

चिंचवडमधून भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप या मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या पाहिजेत. प्रचाराला केवळ तीन दिवस राहिले आहेत. त्यामुळे सर्व कामे बाजूला ठेवून झोकून देवून प्रचारात उतरावे. मतदारांपर्यंत पोहचा. रविवारी मतदानासाठी जास्तीत-जास्त मतदारांना बाहेर काढावे, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना दिल्या.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या विजयासाठी सर्व शिवसैनिक प्रचारात उतरले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री पहाटे चार वाजेपर्यंत काम करत असल्याचे पाहून शिवसैनिकांना आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली. शिवसैनिक तीन दिवस रात्रीचा दिवस करुन प्रचार करतील. ( Chief Minister Eknath Shinde Guidance To Shiv Sena Party Workers In Chinchwad Assembly By Election )

पहाटेचार वाजता मुख्यमंत्री भेटल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झोकून देवून काम करत आहेत. राज्याच्या विकासासाठी चोवीस तास काम करतात. मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्येक पदाधिका-यांशी संवाद साधला. सर्वांकडून चिंचवडचा आढावा घेतला. पहाटे चार वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे आढावा घेत होते. चर्चा करत होते. पहाटे चार वाजता मुख्यमंत्री भेटल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. पोटनिवडणुकीत पूर्ण ताकदिनीशी काम करण्याची ग्वाही सर्व पदाधिका-यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिली.

अधिक वाचा –

– खासदार बारणेंच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; सौरभ हिरवे ठरला ‘महाराष्ट्र श्री 2023’चा मानकरी
– ‘संस्कारक्षम माणूस हा संगतीतून घडतो’, वरसुबाई माध्यमिक विद्यालयात गणेश महाराज जांभळे यांचे सुश्राव्य व्याख्यान


Previous Post

मुंबई-पुणे महामार्गावर दुचाकीस्वाराचा अपघात, विजेच्या खांबावर डोके आदळल्याने युवक जागीच ठार

Next Post

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत ‘आनंदाचा शिधा’, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maharshtra-Mantralay

गुढीपाडवा आणि आंबेडकर जयंतीनिमित्त 100 रुपयांत 'आनंदाचा शिधा', शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.