वडगाव ( Vadgaon Maval ) नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंगेश पांडुरंग खैरे यांची निवड झाली आहे. नगराध्यक्ष तथा पीठासीन अधिकारी मयूर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, गटनेत्या प्रमिला बाफना आदींच्या उपस्थितीत झालेल्या विशेष सभेत खैरे यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड झाल्याचे घोषित केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादीचे स्वीकृत नगरसेवक गणेश म्हाळसकर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी मंगेश खैरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड झाल्याचे ढोरे यांनी जाहीर केले. या विशेष सभेला नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, प्रवीण चव्हाण, शारदा ढोरे, पूजा वहिले, माया चव्हाण, पूनम जाधव, सायली म्हाळसकर आदी उपस्थित होते. ( NCP Mangesh Khaire Elected Unopposed Corporator Of Vadgaon Nagar Panchayat )
मंगेश खैरे यांची निवड होताच त्यांच्या समर्थक कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला. तसेच त्यांचा विशेष सन्मानही करण्यात आला. श्री पोटोबा मंदिर येथे अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर खैरे यांची शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. मंगेश खैरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष म्हणून कार्यरत असून पोटोबा मंदिराचे विश्वस्त म्हणूनही कार्यरत आहेत.
अधिक वाचा –
– क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माऊ गावातील गरीब कुटुंबाचा संसार जळून खाक
– ‘मनरेगा’तून उभारले सार्वजनिक गोदाम, मावळमधील ‘आढे पॅटर्न’ची जिल्ह्यात चर्चा, आमदार-खासदार यांच्या हस्ते उद्घाटन