मावळ तालुक्यातील टाकवे इथे पार पडलेल्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळा शहरातील शिवदुर्ग फिटनेस क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले. यात 3 सुवर्ण पदाकांचा समावेश आहे. टाकवे इथे 12 ते 14 वर्षे वयोगटाखालील मुले आणि मुली यांच्याकरिता वेटलिफ्टिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
View this post on Instagram
शिवदुर्गच्या विघ्नेश शिंदे (सुवर्णपदक), चैतन्य फाटक (सुवर्णपदक) कु. आदिती गायकवाड (सुवर्णपदक), कु. प्रीती दुडे (रौप्यपदक) आणि कु. हर्षदा घारे (चौथा क्रमांक) मिळवला. अशी एकूण 5 पदक जिंकण्याची कामगिरी केली. हे सर्व खेळाडू शिवदुर्ग फिटनेस इथे अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. ( Weightlifting Competition At Takve Maval Shivdurg Fitness Club Lonavala Athletes Achieved Great Success )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माऊ गावातील गरीब कुटुंबाचा संसार जळून खाक
– वडगाव नगरपंचायत स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादीचे मंगेश खैरे बिनविरोध, शहरातून भव्य मिरवणूक – व्हिडिओ