मावळ तालुक्यातील अनेक गावं, शहरं इथे भरणाऱ्या आठवडे बाजारांपैकी वडगाव शहर या तालुक्याच्या ठिकाणी भरणारा आठवडे बाजार भरपूर मोठा असतो. वडगाव मावळ शहरात दर गुरुवारी हा आठवडे बाजार भरत असतो. फक्त वडगाव शहरच नाही तर परिसरातील अनेक गाव, वस्त्यांवरील नागरिक या दिवशी खरेदीसाठी बाजारात येत असतात. तसेच इथे येणारे अनेक लहान मोठे विक्रेते, शेतकरी, भाजी विक्रेते यांसह मुख्य बाजारातील विविध व्यावसायिक यांच्यासाठीही आठवडे बाजाराचा हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. ( Demand To Ban Entry Of Four Wheeler On Main Road In Vadgaon Maval City On Weekly Market Day )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मात्र मागील काही दिवसांपासून नगरपरिषदेकडून संथ गतीने सुरु असलेले रस्त्याचे काम यासह बाजाराच्या दिवशी त्यातही मुख्यतः सायंकाळच्या वेळी बाजाराच्या मुख्य रस्त्यावर येणारी चारचाकी वाहने, अवजड वाहने यांच्यामुळे बाजाररहाट करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा ट्राफिक जॅममुळे सामान्यांना चालणेही मुश्कील होत असते. हॉर्नचे कर्णकर्कश आवाज, कधी झाले तर वादविवाद भांडणे, यामुळेही सामान्यांना त्रास होतो. त्यामुळेच आठवडे बाजाराच्या दिवशी किमान सायंकाळी निश्चित काही तासांसाठी बाजाराच्या मुख्य रस्त्यावर चारचाकी, अवजड वाहनांना प्रवेश बंदी करावी, अशी सामन्यांची मागणी आहे.
अधिक वाचा –
– तळेगाव दाभाडे पोलिसांचे बांधकाम व्यावसायिकांना महत्वाचे आवाहन, ‘जर कुणीही….’
– वन्यजीव रक्षक मावळचे निलेश गराडे यांना डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते ‘इंद्रायणी विद्यामंदिर पुरस्कार’