व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, September 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव शहरात महाआरोग्य शिबिर संपन्न, हजारो रुग्णांनी घेतला मोफत औषधोपचाराचा लाभ

वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त (14 फेब्रुवारी) मोरया प्रतिष्ठान आणि सनराईज मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव मावळ येथे दिनांक 12 फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 14, 2023
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
Mahaarogya-Camp-In-Vadgaon-Maval-City

Photo Courtesy : FB / Mayur Prakashrao Dhore


वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त (14 फेब्रुवारी) मोरया प्रतिष्ठान आणि सनराईज मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वडगाव मावळ येथे दिनांक 12 फेब्रुवारी रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात वडगाव शहरातील हजारो रुग्णांनी मोफत औषधोपचाराचा लाभ घेतला.

मोरया प्रतिष्ठान आणि सनराइज मेडिकल फाउंडेशनच्या वतीने रविवारी (12 फेब्रुवारी) एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात वडगाव शहरातील सुमारे अडीच ते तीन हजार रुग्णांनी सहभागी होऊन मोफत औषधे व उपचार घेतले. महाआरोग्य शिबिर भव्य स्वरूपात राबवण्यात येत असताना येथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची मोरया महिला प्रतिष्ठान आणि मोरया ढोल पथकातील स्वयंसेवकाच्या माध्यमातून शिस्तबद्ध पद्धतीने नोंदणी करून तसेच मदत कक्षाद्वारे रुग्णांना आवश्यक ते सहकार्य केले जात होते. ( Mahaarogya Camp In Vadgaon Maval City Thousands Of Citizens Took Benefit Of Free Medicine )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मोरया प्रतिष्ठान व सनराइज मेडिकल फाउंडेशनने आयोजित केलेल्या महाशिबिरात आदित्य बिर्ला हॉस्पिटल, रुबी एलकेअर हॉस्पिटल, लोकमान्य हॉस्पिटल, इंडियन डेंटल असोसिएशन, डी वाय पाटील हॉस्पिटल, फिनिक्स हॉस्पिटल, डॉ. अग्रवाल नेत्र रुग्णालय, मायमर हॉस्पिटल, TGH आँन्को लाईप कॅन्सर सेंटर, साईदीप, स्पर्श अशी विविध नामांकीत रुग्णालये शिबिरात सहभागी झालेली होती. शिबीरात प्रत्येक हॉस्पिटलचे वेगवेगळे विभाग केले असल्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करून रुग्णांना तत्काळ मोफत औषधे व उपचार उपलबध करून देण्यात सोपे झाले होते.

यावेळी शहरातील सुमारे 700 रुग्णांनी डोळ्यांची तपासणी केली असता यातील एकूण 570 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. शहरातील नागरिकांनी आरोग्य शिबिरात तपासणी केल्यानंतर ज्या रुग्णांना हृदय, अन्ननलिका, मोतीबिंदू, हाडाचे फ्रॅक्चर कान नाक घसा, मुतखडा, सांधे, अपेंडिक्स, मुळव्याध, दंतचिकित्सा, हर्निया, पित्ताशय व पित्ताशयातील खडे, मूत्रशयाचे कॅन्सर, गर्भाशयातील गाठी डोळ्यांच्या व मेंदूच्या इत्यादी शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे, अशा रुग्णांना त्यांच्या सोयीनुसार पुणे, पिंपरी, चिंचवड तसेच मुंबई येथील नामांकित रुग्णालयांमध्ये मोफत किंवा अतिशय अत्यल्प दरात पुढील दिवसांत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती अबोली ढोरे आणि सनराइज फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन मराठे त्यांनी माहिती दिली. ( Mahaarogya Camp In Vadgaon Maval City Thousands Of Citizens Took Benefit Of Free Medicine )

आरोग्य शिबिराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री मदन बाफना, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, सनराइज मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन मराठे, तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष गणेश काकडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे, माजी उपसरपंच पंढरीनाथ ढोरे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते अपंग रुग्णांना मोफत व्हिल चेअर आणि वाॅकर चे वाटप करण्यात आले.

अधिक वाचा – भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! पुणे-नाशिक महामार्गावर महिलांच्या घोळक्याला भरधाव वाहनाची धडक, 5 महिला ठार

यावेळी जेष्ठ नेते मंगेश ढोरे, तज्ञ संचालक सुभाषराव जाधव, माजी उपसरपंच तुकाराम ढोरे, चंदुकाका ढोरे, सुनिल चव्हाण, बारकू ढोरे, सुरेश कुडे, शांताराम कुडे, नितीन भांबळ, नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजी ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, शारदा ढोरे, माया चव्हाण, रा. युवक अध्यक्ष अतुल वायकर, गणेश पवार, धिरज लोहार सर, नंदकुमार कलांगते, सचिन कडू, नितीन चव्हाण, सुरेश जांभुळकर, मंगेश खैरे, गणेश महाळस्कर, गणेश बरदाडे, सोमनाथ धोंगडे, युवराज ढोरे, महेंद्र ढोरे, शरद ढोरे, गणेशभाऊ ढोरे, सिद्धेश ढोरे, मयुर गुरव आणि मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका, सदस्या, मोरया ढोल पथक सभासद, शहरातील सर्व पत्रकार बांधव, वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

आरोग्य शिबिरात सहभागी झालेल्या सर्व डॉक्टर्स बांधवांचे तसेच सनराइज फाउंडेशनचे पदाधिकारी यांना मोरया प्रतिष्ठानच्या वतीने मयूर ढोरे आणि अबोली ढोरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्त पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा –

– खासदार बारणेंच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची रेलचेल; क्रिकेट स्पर्धा ते बैलगाडा शर्यत, वाचा कधी, कुठे काय ते?
– वडगाव नगरपंचायतमार्फत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी आणि डिजिटल कार्ड वाटप शिबीर


dainik maval jahirat

Previous Post

भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! पुणे-नाशिक महामार्गावर महिलांच्या घोळक्याला भरधाव वाहनाची धडक, 5 महिला ठार

Next Post

मावळ तालुक्यात ‘जंगलराज’ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maval-Crime

मावळ तालुक्यात 'जंगलराज'ची झलक! शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी, वडगाव पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

BJP takes an aggressive stance against MLA Sunil Shelke statement demands registration of case

आमदार सुनील शेळके यांच्या वक्तव्याविरोधात भाजपा आक्रमक ; गुन्हा दाखल करण्याची मागणी

September 30, 2026
Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.