आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत भारत सरकारकडून लाभार्थ्यांचा दरवर्षी 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा काढला जातो. या योजनेत 13 हजार रुग्णालयांचा समावेश असून जिथे अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात. आयसीओ, नाॅन आयसीओ, मेडिकल उपचार, हॉस्पिटलायझेशन निदान आणि उपचार, राहण्याची-खाण्याची व्यवस्था मोफत होते. मात्र, नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना अगोदर आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड दाखवणे आवश्यत असते. बीपीएल कार्डधारकांना या योजनेचा सहज लाभ मिळतो, अशी माहिती मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहरामध्ये या योजनेचा लाभ मिळू शकेल, असे 395 लाभार्थी आहेत. परंतू त्यातील 310 जणांनी अद्याप योजनेचे कार्ड काढलेले नाहीत. त्यांच्यासाठी एका महिन्याच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लाभार्थी नोंदणी आणि डिजिटल कार्ड वाटपासाठी नगरपंचायतीत स्वतंत्र कक्ष सुरू केला असून लाभार्थ्यांनी आपले मूळ आधार कार्ड व मूळ रेशन कार्ड दाखवून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहान नगराध्यक्ष मयूर ढोरे आणि उपनगराध्यक्ष राजेंद्र कुडे यांनी केले आहे. ( Beneficiary Registration And Digital Card Distribution Camp For Ayushman Bharat Yojana Through Vadgaon Nagar Panchayat )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगर पायथ्याजवळ भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
– वडगाव नगरपंचायतकडून ‘मावळ दुर्गा अभियान’, मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन