बुधवारी (दिनांक 8 फेब्रवारी) माघ कृष्ण तृतिया या दिवशी श्री संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी वडगाव मावळ शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. वडगाव शहरातील द्वारकाधीश लॉन्स येथे पांचाळ सुवर्णकार समाज सेवा संघ मावळ यांच्यावतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची 737 वा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी पांचाळ सुवर्णकार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे हेही उपस्थित होते. संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त शहरात टाळ-मृदंगाच्या जगरात दिंडीही काढण्यात आली. ( 737th Death Anniversary Of Shri Saint Narahari Maharaj Celebrated In Vadgaon City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– वडगाव नगरपंचायतकडून ‘मावळ दुर्गा अभियान’, मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन
– वडगाव नगरपंचायतमार्फत आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत लाभार्थी नोंदणी आणि डिजिटल कार्ड वाटप शिबीर