पुणे जिल्ह्यात ( Pune News ) एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर जवळ पुणे-नाशिक महामार्गावर सोमवारी (दिनांक 13 फेब्रुवारी) रात्री झालेल्या गंभीर अपघातात एकूण 5 महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अन्य 13 महिला जखमी आहेत. राजगुरुनगर जवळील शिरोली (तालुका खेड) परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली. ( Major Accident On Pune Nashik Highway Near Rajgurunagar Car Heat And Run 5 Women Dead 13 Injured )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
नेमके काय घडले?
प्राप्त माहितीनुसार, सर्व महिला अत्यंत गरीब कुटुंबातील असून एका मंगल कार्यालयात जेवण बनवण्यासाठी निघाल्या होत्या. पुण्याकडून येणाऱ्या बसमधून खरपुडी फाटा इथे उतरून त्या शिरोली इथे निघाल्या होत्या. तेव्हा साधारण रात्री 11 च्या सुमारास पुणे-नाशिक हायवे ओलांडत असताना एका भरधाव कारने या महिलांना उडवले. अक्षरशः काही महिला यात चिरडल्या गेल्या. अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तसेच 13 महिला जखमी आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या महिलांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालय आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक पसार झाला असून खेड पोलिस त्याचा शोध घेत आहेत. गरीब कुटुंबातील महिलांचा झालेला मृत्यू घरातील मायेचा हात हरपल्याने अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ( Major Accident On Pune Nashik Highway Near Rajgurunagar Car Heat And Run 5 Women Dead 13 Injured )
अधिक वाचा –
– श्रीरंगआप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर! विविध क्षेत्रातील 20 मान्यवरांचा होणार सन्मान, पाहा पुरस्कार्थ्यांची यादी
– भीषण अपघात! इंजिनाच्या धडकेत 4 रेल्वे कामगार जागीच ठार, महाराष्ट्र हळहळला