मावळ लोकसभेचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. खासदार श्रीरंग बारणे यांचा 16 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असतो. त्यानिमित्त त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे यांच्यावतीने एकविरा क्रिकेट क्लब भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धा 8 फेब्रुवारीपासून घेण्यात येत आहे. 15 फेब्रुवारीला दहावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेला सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन होणार आहे. युवा सेना अधिकारी विश्वजित बारणे, शहरप्रमुख निलेश तरस, महिला संघटिका सरिता साने यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे. ( Various programs Organized In Constituency On Occasion Of Maval Lok Sabha MP Shrirang Barne Birthday )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
दिनांक 15, 16 फेब्रुवारी रोजी उपजिल्हाप्रमुख दत्ता केदारी यांच्या माध्यमातून मळवलीला भव्य बैलगाडा छकडी स्पर्धा होणार आहे. 15 फेब्रुवारीला तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समिती, शिवसेनेच्या वतीने खासदार बारणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन केले आहे.
खासदार बारणे यांचा 16 फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. त्यादिवशी सकाळी श्री मोरया गोसावी मंदिराच श्रींचा अभिषेक होणार आहे. सायंकाळी रामकृष्ण मोरे सभागृहात विविध मान्यवरांचा गौरव व अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. त्याचबरोबर सरिता साने, प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने मोफत फिजीयोथेरपी शिबिर होणार आहे. ( Various programs Organized In Constituency On Occasion Of Maval Lok Sabha MP Shrirang Barne Birthday )
दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र श्री 2023 राज्यस्तरीय भव्य शरीरसौष्ठव स्पर्धा विजयनगर काळेवाडी येथे होणार आहे. सुनील पाथरमल यांनी स्पर्धेचे नियोजन केले आहे. 21 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य तपासणी, रोगनिदान शस्त्रक्रिया शिबिर, नेत्र तपासणी, चष्मा वाटप, लहान मुलांची मोफत हृदयशस्त्रक्रिया कार्ला येथे होणार आहे. युवा सेना तालुकाप्रमुख विशाल हुलावळे यांनी शिबिराचे आयोजन केले आहे.
अधिक वाचा –
– श्रीरंगआप्पा बारणे सोशल फाउंडेशनचे पुरस्कार जाहीर! विविध क्षेत्रातील 20 मान्यवरांचा होणार सन्मान, पाहा पुरस्कार्थ्यांची यादी
– राष्ट्रीय लोक अदालतीत 78 हजार प्रलंबित दावे निकाली, पुणे जिल्हा सलग नवव्यांदा राज्यात प्रथम