मावळ ( Maval Crime ) तालुक्यातील शिवली गावात रस्त्याच्या वादातून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. ( Big Fight Due To Road Dispute In Shivali Village Of Maval Taluka In Pune District )
प्राप्त माहितीनुसार, मावळ तालुक्यातील ( Maval News ) शिवली गावात राहणाऱ्या कदम कुटुंबियाचा पूर्वीपासूनचा येण्या जाण्याचा रस्ता खोदल्यामुळे त्यांनी वडगाव मावळ पोलीस ( Vadgaon Maval Police ) स्टेशनला तक्रार दिली होती. या तक्रारीचा राग मनात ठेवून गावातील कदम कुटुंबाला गावगुंडांनी फावडे, दगडाने,आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, हा सर्व प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका नागरिकाने मोबाईलमधील कॅमेरात कैद केला आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
यासंदर्भात सविता सुरेश कदम यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून त्यानुसार आरोपी नितेश अनंता आडकर, रामभाऊ नारायण आडकर, देविदास बबन आडकर, तानाजी रामभाऊ आडकर, संगीता अनंता आडकर विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमध्ये तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सविता कदम, विशाल कदम, रमेश कदमतिघे मारहाणीत जखमी झाले आहेत. ( Big Fight Due To Road Dispute In Shivali Village Of Maval Taluka In Pune District )
अधिक वाचा –
– भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! पुणे-नाशिक महामार्गावर महिलांच्या घोळक्याला भरधाव वाहनाची धडक, 5 महिला ठार
– भीषण अपघात! इंजिनाच्या धडकेत 4 रेल्वे कामगार जागीच ठार, महाराष्ट्र हळहळला