मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने नववर्षानिमित्त दिनांक 1 जानेवारी रोजी वडगाव मावळ शहरात पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या संकल्पनेतून शहरात प्रथमच हा पतंग महोत्सव 2023 रविवारी (दिनांक 1 जानेवारी) रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हॉटेल अक्षय पॅलेस शेजारील भव्य मैदानात होणार आहे. ( Kite Festival On 1st January 2023 In Vadgaon Maval Town )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वडगाव शहरातील लहान मुले, मुली, महिला, युवक ते ज्येष्ठ या महोत्सवात पतंग उडवण्याचा आनंद घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवातील विविध प्रकारचे पतंग पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त पतंग प्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. याकरिता 31 डिसेंबरपर्यंत नाव नोंदणी नगराध्यक्ष मयूर ढोरे जनसंपर्क कार्यालयात करावी, असे आवाहन केले आहे. सर्वांना पतंग आणि दोरा (रिळ) पतंग महोत्सवाच्या ठिकाणी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अधिक वाचा –
– कोथुर्णेच्या निर्भयाला न्याय द्या, मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, अजितदादांची सभागृहात मागणी – पाहा व्हिडिओ
– मोठी बातमी! इंदोरी कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पुलाचा प्रस्ताव सादर करण्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आदेश