इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या नावाने दरवर्षी प्रमाणे आयोजित केलेल्या व्याख्यान मालेला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे उपस्थित होते. यावेळी त्यांनी व्याख्यानमालेत ‘भारताची सौम्य संपदा’ या विषयावर तिसरे विचार पुष्प गुंफले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळचे माजी आमदार कृष्णराव भेगडे यांनी तालुक्यातील शिक्षण, उद्योग, साहित्य, समाजकारण आणि सहकार क्षेत्रात अमुल्य योगदान दिले आहे. त्यांचे कार्य आणि विचार युवा पिढीपर्यंत पोचवण्यासाठी सदर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार विनय सहस्त्रबुद्धे याचे इंद्रायणी विद्या मंदिर, तळेगाव दाभाडे इथे आगमन झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, मावळ भाजपा तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, संस्थेचे अध्यक्ष उद्योजक रामदास काकडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अधिक वाचा –
– सोमाटणे येथील गीता विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थ्याचे जेईई परीक्षेत घवघवीत यश, शाळेकडून दुचाकी भेट
– जांभूळ गावातील पापड उत्पादक गटाच्या महिलांना हॅन्ड इन हॅन्ड संस्था आणि बेलस्टार यांच्याकडून मोठी मदत