मावळ तालुक्यातील ( Maval News ) कुसगाव बुद्रुक येथे भारतीय जनता पार्टीचे ( Maval BJP ) ज्येष्ठ नेते, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता गुंड यांच्या वाढदिवसानिमित्त अत्यंत माफक दरात श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय जनता पार्टी मावळ तालुका आणि कुसगाव ग्रामपंचायत ( Kusgaon Budruk ) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शेकडो लोकांनी या सेवेचा लाभ घेतला. रुपये 500 इतक्या कमी किंमतीत श्रवणयंत्रे उपलब्ध करुन देण्यात आले होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मावळ भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित होते. त्यांच्या हस्तेही अनेकांना श्रवणयंत्राचे वाटप करण्यात आले. यासह उद्धव ठाकरे गट तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, युवा नेते माऊली गुंड, सरपंच अश्विनी गुंड, बाळासाहेब ठाकर, राजू काटकर, मधुकर कडू, किसन गुंड, लहू गुंड यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ( Distribution Of Hearing Aids To Needy At Discounted Rates At Kusgaon Budruk )
अधिक वाचा –
– श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळ निवडणूक, लोणावळा ग्रामीण पोलिसांचा रुट मार्च – व्हिडिओ
– दैनिक मावळ विशेष । आठ हजारहून अधिक सरपंच, ग्रामसदस्यांना वक्तृत्व कौशल्याचे धडे देणारे मावळरत्न ‘विवेक गुरव’