भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि महाराष्ट्र कन्या प्रतिभाताई पाटील यांच्याबाबत एक दुःखद बातमी समोर येत आहे. प्रतिभा पाटील यांचे पती ज्येष्ठ नेते देवीसिंह शेखावत यांचे पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या 89 व्या वर्षी देवीसिंह शेखावत यांनी अखेरचा श्वास घेतला. ( Former President Of India Pratibha Patil Husband Devisingh Shekhawat Passed Away In Pune Hospital )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने पुण्यातील प्रसिद्ध केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज (शुक्रवार, 24 फेब्रुवारी) सकाळी साडेनऊच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आजच संध्याकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
देवीसिंह शेखावत यांची कारकीर्द…
भारतीय काँग्रेसचे नेते राहिलेले देवीसिंह शेखावत हे रसायनशास्त्राचे अभ्यासक होते. त्यांना मुंबई विद्यापीठाकडून पीएचडी मिळाली होती. अमरावतीचे महापौर म्हणूनही त्यांनी काम केले. तसेच, महाराष्ट्र राज्य विधानसभा सदस्य यांसह राजस्थानचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केले होते. प्रतिभा पाटील या राष्ट्रपती झाल्यावर देशाचे प्रथम पुरुष म्हणून ते सर्वांना परिचित झाले होते. तसेच त्यांचे पुत्र रावसाहेब शेखावत हेही राजकारणात सक्रीय आहेत.
अधिक वाचा –
– मुख्यमंत्री प्रचाराला आले अन् ठाकरे गटाला खिंडार पडले; पिंपरी-चिंचवडमधील ठाकरेंचे अनेक विश्वासू शिंदे गोटात
– गुडन्यूज! शिधापत्रिकाधारकांना फेब्रुवारीच्या धान्यासोबतच जानेवारीचे धान्य, मोबाईल क्रमांक जोडण्याचेही आवाहन