शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक, स्मार्ट सिटीचे माजी संचालक प्रमोद कुटे, महिला संघटिका उर्मिला काळभोर यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांच्या प्रचारार्थ रहाटणीत मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. शिवसेना उपनेते, खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे आदी उपस्थित होते. ( Assembly By Elections Uddhav Thackeray Group Leaders From Pimpri Chinchwad Joined Shiv Sena Party In Presence Of CM Eknath Shinde )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आकुर्डी भागातून प्रमोद कुटे निवडून आले होते. स्मार्ट सिटीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. ठाकरे गटात असलेल्या प्रमोद कुटे यांच्यासह महिला संघटिका उर्मिला काळभोर, विभागप्रमुख फारुक शेख, मंगेश कुटे यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या पुढाकारातून शिवसेनेत प्रवेश केला.
पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकराचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे अनधिकृत घरांचा प्रश्न सुटणार आहे. प्राधिकरण बाधितांना साडेबारा टक्के परतावा देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे शिवसेनेत प्रवेश केल्या असल्याचे प्रमोद कुटे यांनी सांगितले.
हेही वाचा – श्रीरंग बारणेंचे मंत्रिपद फिक्स? आढळराव पाटलांनी भर सभागृहात चंद्रकांत पाटलांना केली ‘ही’ खास विनंती
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वार शिवसैनिकांचा विश्वास आहे. त्यामुळेच ठाकरे गटातील लोक शिवसेनेत येत आहे. शहरात शिवसेनेची ताकद वाढत आहे. शिवसेना-भाजप युतीचे सरकार शहरातील प्रलंबित प्रश्न सोडवित आहे. आगामी काळात शहरातील सर्व प्रश्न मार्गी लागतील.
अधिक वाचा –
– खासदार श्रीरंग बारणेंच्या पाठपुराव्याला यश; मतदारसंघातील ‘या’ विकासकामासाठी राज्य सरकारकडून 47 कोटींचा निधी
– खासदार बारणेंच्या वाढदिवसानिमित्त शरीरसौष्ठव स्पर्धा; सौरभ हिरवे ठरला ‘महाराष्ट्र श्री 2023’चा मानकरी