व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 1, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

रस्त्यावर खडी टाकल्यामुळे वाद, 70 वर्षीय वृद्धावर तलवारीने वार करण्याचा प्रयत्न, बेबडओहळ येथील धक्कादायक प्रकार!

मावळ तालुक्यातील मौजे बेबडओहळ येथे रस्त्यावर खडी टाकल्याच्या कारणावरुन एका 70 वर्षीय वृद्धाला तलवारीचा धाक दाखवून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 23, 2023
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
Shirgaon-Police-Station

File Image : Shirgaon Police Station


मावळ तालुक्यातील ( Maval News ) मौजे बेबडओहळ येथे रस्त्यावर खडी टाकल्याच्या कारणावरुन एका 70 वर्षीय वृद्धाला तलवारीचा धाक दाखवून मारहाण करण्याचा प्रयत्न ( Maval Crime ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी फिर्यादी भालचंद्र हरीभाऊ भालेराव (वय 70, रा. बेबडओव्हळ ता मावळ जि पुणे) यांनी शिरगाव पोलिसांत ( Shirgaon Police Station ) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी विनोद रमेश गायकवाड (वय 45 वर्षे, रा. बेबडओव्हळ ता मावळ जि पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

शिरगाव पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम 504, 506 भा. ह. कायदा कलम 4 (25), महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37 (1) (3) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ( Elderly Man Attacked With Sword At Bebadohal Village Case Registered Shirgaon Parandwadi Police Station )

प्राप्त माहितीनुसार, दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास मौजे बेबडओहळ (तालुका मावळ जिल्हा पुणे) इथे फिर्यादी भालचंद्र हरीभाऊ भालेराव हे त्यांच्या राहत्या घरासमोर दुचाकी वाहन धुवत असताना, आरोपी विनोद रमेश गायकवाड तिथे आला. त्याने भालचंद्र भालेराव यांना रस्त्यावर खडी टाकण्याच्या कारणावरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला घरी जा म्हणून सांगितले.

मात्र, आरोपीने राग मनात धरून घरी जात घरातून तलवार सदृश्य हत्यार घेऊन पुन्हा शिवीगाळ करत भालचंद्र भालेराव यांच्या घरी आला. तसेच, हातातील तलवार सदृश्य हत्यार घेऊन दोनदा भालेराव यांना मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमुद आहे. या प्रकरणी आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नसून पोलिस हवालदार वाडीले हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

अधिक वाचा –

– क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं! शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत माऊ गावातील गरीब कुटुंबाचा संसार जळून खाक
– ‘मनरेगा’तून उभारले सार्वजनिक गोदाम, मावळमधील ‘आढे पॅटर्न’ची जिल्ह्यात चर्चा, आमदार-खासदार यांच्या हस्ते उद्घाटन


dainik maval jahirat

Previous Post

मुख्यमंत्री प्रचाराला आले अन् ठाकरे गटाला खिंडार पडले; पिंपरी-चिंचवडमधील ठाकरेंचे अनेक विश्वासू शिंदे गोटात

Next Post

ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

ताब्यात घ्यायला आलेल्या पोलिसावर हल्ला करत आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vehargaon Dahivali Villagers rasta roko demand cancellation of proposed ropeway project at Ekvira Devi temple

वेहरगाव, दहिवली ग्रामस्थांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको ; एकविरा देवी मंदिर येथील प्रस्तावित रोप-वे प्रकल्प रद्द करण्याची मागणी

August 31, 2026
Narali-Poornima

नारळी पौर्णिमा विशेष : “सण आयलाय गो, आयलाय गो नारली पुनवेचा…” । कोळीबांधव समुद्रात नारळ का सोडतात? जाणून घ्या

August 28, 2026
Maval Cricketer Sampat Satkar passes away gloom descends on sports world

मावळचे ‘क्रिकेटरत्न’ संपत सातकर यांचे निधन, क्रीडा विश्वावर शोककळा

August 28, 2026
Tata Group called upon to assist flood victims in Lonavala meeting held in presence of MLA Sunil Shelke

लोणावळ्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी टाटा कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक

August 28, 2026
Horrific accident within limits of Waksai village near Karla Phata Maval speeding car plunges into astream two dead

कार्ला फाट्याजवळील वाकसई गावाच्या हद्दीत भीषण अपघात ; भरधाव कार थेट ओढ्यात कोसळली, दोघांचा मृत्यू

August 28, 2026
Akhand Wari Lifetime Achievement Award 2026 by Kamshet Rural Journalists Association Maval

कामशेत ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी ‘अखंड वारी जीवनगौरव पुरस्कार- २०२६’चे वितरण

August 28, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.