पवनमावळ येथील तुंग गावात समुदाय केंद्राचे उद्धघाटन करण्यात आले. दिनांक 31 जानेवारी रोजी हॅन्ड इन हॅन्ड इंडिया संस्था तळेगाव दाभाडे आणि युनिव्हर्सल शॅम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्या उपजिविका आणि पर्यावरण संवर्धन केंद्रित हरित ग्रामनिर्माण प्रकल्पांतर्गत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
समुदाय केंद्राचा उद्देश हा तुंग गावातील लोकांसाठी शेती, आरोग्य, विविध शासकीय योजना इत्यादी विषयावर अद्यावत माहिती उपलब्ध करून देणे असा आहे. यामध्ये विशेषत: तरुण मुलांना व्यवसाय, रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक पुस्तके उपलब्ध करून देणे हे आहे. समुदाय केंद्रामध्ये विविध वयोगटातील ग्रामस्थांसाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. ( Inauguration of Community Center in Tung Village Maval Books For Citizens By Hand in Hand organization Talegaon Dabhade )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
शेतीत येणाऱ्या अडचणी, महिला सक्षमीकरण आणि महिलांचे आरोग्य, लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी पुस्तके, जेष्ठ नागरिकांना वाचनाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे तुंग सारख्या दुर्गम भागातील लोकांना विविध बाबींवर अद्यावत माहिती उपलब्ध होणार असून यामुळे गावच्या विकासासाठी मदत होणार आहे. या केंद्रासाठी टेबल, खुर्च्या व कपाट देण्यात आले, त्यामुळे ग्रामस्थांना समुदाय केंद्रात आवश्यक सुविधा उपलब्ध असणार आहेत.
समुदाय केंद्राचा जास्तीत जास्त लोकांनी उपयोग करून घ्यावा, असे हँड इन हँड इंडिया संस्थेचे ओंकार कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी ग्रामसेवक यांनी संस्थेचे व कंपनीचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी गावचे सरपंच वसंत म्हसकर, ग्रामसेवक ए. एल. भानवसे, निवृत्ती गोणते, दादासाहेब वाघमारे, ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच संस्थेच्या वतीने संस्थेचे सारिका शिंदे, निकीता मोरे आणि पंढरीनाथ बालगुडे हे उपस्थित होते.
अधिक वाचा –
– दुःखद बातमी : कामशेतजवळील अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नाकर शहा यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका दिव्यांग सेलच्या महिला अध्यक्षपदी सारिका ढमाले