मावळ तालुक्यात जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कामशेत जवळील खिंडीत दिनांक 29 जानेवारी 2023 रोजी एक भीषण अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रत्नाकर शहा यांचे आज (दिनांक 1 फेब्रुवारी) रोजी दुःखद निधन झाले. अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या रत्नाकर शहा यांच्यावर पुण्यातील संचेती रुग्णालयात उपचार सुरु होते. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र उपचारादरम्यान शहा यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. ( Ratnakar Shah From Khopoli Raigad Died At Sancheti Hospital Pune During Treatment After An Accident Near Kamshet Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मुळ खोपोली (काटरंग, खोपोली, जि. रायगड) येथील रहिवासी असलेले रत्नाकर शहा हे नोकरी-व्यावसायनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होते. ते रविवारी (29 जानेवारी) खोपोली येथूनच पुणे येथे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत जात असताना जुन्या मुंबई पुणे महामार्गावर कामशेतजवळ त्यांचा अपघात झाला. विरुद्ध दिशेने एक अनियंत्रित कंटेनर दुभाजक तोडून पुणे दिशेने जाणाऱ्या लेनवर शहा यांच्या कारला जोरदार धडक देऊन खोल खड्ड्यात कोसळला होता. यात शहा यांच्या कारला झालेल्या अपघातात स्वतः रत्नाकर शहा यांसमवेत त्यांच्या पत्नीला आणि लहान मुलीलाही दुखापत झाली होती. पैकी पत्नीला उपचारानंतर डिस्चार्ज मिळाला होता. मात्र रत्नाकर शहा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर संचेती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आजअखेर (बुधवार) सायंकाळी 5 वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने खोपोलीतील शहा कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! कामशेतजवळ जुन्या मुंबई-पुणे हायवेवर भीषण अपघात – पाहा व्हिडिओ
– ‘लक्ष्मण भाऊंच्या निधनापूर्वीच भाजपकडून निवडणूकीची तयारी’, आमदार सुनिल शेळकेंच्या आरोपांमुळे खळबळ
– केंद्रीय अर्थसंकल्प 2023 : करदात्यांसाठी मोठी खुशखबर, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त राहणार