व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, May 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘लक्ष्मण भाऊंच्या निधनापूर्वीच भाजपकडून निवडणूकीची तयारी’, आमदार सुनिल शेळकेंच्या आरोपांमुळे खळबळ

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पहिली आढावा बैठक सोमवारी (31 जानेवारी) पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 31, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
MLA-Laxman-Jagtap-MLA-Sunil-Shelke

File Image


चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने पहिली आढावा बैठक सोमवारी (31 जानेवारी) पार पडली. या बैठकीत अनेक पदाधिकारी आणि आमदार उपस्थित होते. परंतू, या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केलेल्या एका विधानामुळे आणि भाजपावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी निधन झाले. त्यामुळे चिंचवड विधानसभेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी आजपासूनच (31 जानेवारी) नामनिर्देशनपत्र दाखल करायचे आहेत. परंतू, चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजपा आग्रही आहे. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीकडून या दोन्ही ठिकाणची निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरु आहे. ( Before Death of MLA Laxman Jagtap BJP Start Election Preparations Serious Accusation of Maval NCP MLA Sunil Shelke Chinchwad Assembly By Election )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली बैठक दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या बालेकिल्ल्यात सोमवारी पार पडली. राष्ट्रवादीने या निवडणूकीची जबाबदारी मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्यावर टाकली आहे. त्यामुळे बैठकीला सुनिल शेळके उपस्थित होते. यावेळी बैठकीनंतर सुनिल शेळकेंनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका करत निवडणूक लढवण्याचे कारण सांगितले.

लक्ष्मणभाऊंच्या जाण्याअगोदर भाजपाकडून निवडणूकीची तयारी….

“आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन 3 जानेवारीला झाले. मात्र भाऊ जाण्याच्या अगोदर किंवा त्यांच्या अखेरच्या दिवसांच्या कालावधीत भाजपाने निवडणूकीची तयारी सुरु केली होती. लक्ष्मण जगताप यांच्या जाण्याच्या तीन महिने आधीपासून चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तयारी भाजपाने सुरू केली होती. मग जर त्यांनाच संवेदनशीलता नसेल तर मग ही निवडणूक आम्ही बिनविरोध का करावी?” असा प्रश्नच सुनिल शेळकेंनी उपस्थित केला. ( Before Death of MLA Laxman Jagtap BJP Start Election Preparations Serious Accusation of Maval NCP MLA Sunil Shelke Chinchwad Assembly By Election )

अधिक वाचा –

– भंडारा डोंगर येथे सर्वांच्या प्रयत्नाने संत तुकाराम महाराजांचे भव्य मंदिर उभे राहील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
– मोठी बातमी! श्री पोटोबा महाराज देवस्थान आणि श्री डोळसनाथ महाराज देवस्थान या ठिकाणांना ‘क-वर्ग’ तीर्थस्थळाचा दर्जा


Previous Post

श्री अमरदेवी नागरी सहकारी पतसंस्थेच्या नुतन शाखेचे उद्घाटन; बाळा भेगडे, रविंद्र भेगडे, गणेश खांडगे उपस्थित

Next Post

‘गर्जा महाराष्ट्र माझा’ आपले राज्यगीत ते १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय एका क्लिकवर

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Eknath-Shinde-Devendra-Fadanvis

'गर्जा महाराष्ट्र माझा' आपले राज्यगीत ते १२ नवीन समाजकार्य महाविद्यालय स्थापणार; वाचा शिंदे सरकारचे सर्व निर्णय एका क्लिकवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jail-And-Court

देहूरोड सामूहिक बलात्कार प्रकरण : चार नराधमांना दुहेरी जन्मठेपेची कठोर शिक्षा

May 11, 2026
woman died after falling from eighth floor incident at Katvi in ​​Vadgaon Maval area

Video : आठव्या मजल्यावरून पडल्याने एका महिलेचा मृत्यू, वडगाव मावळ परिसरातील कातवी येथील घटना

May 11, 2026
Neelam Gorhe held an administration meeting regarding rape of a minor girl in Pawana Dam area ​​Lonavala

लोणावळा ग्रामीण हद्दीत पवना डॅम परिसरात झालेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंनी घेतली प्रशासनाची बैठक

May 11, 2026
Sainath Varghade from Ardav Maval has passed 10th exam after 26 years by solving English subject

‘इंग्रजी’ भाषेवर जिद्दीने केली मात ! तब्बल २६ वर्षानंतर आर्डव गावचे ‘साईनाथभाऊ’ झाले दहावी पास

May 10, 2026
Bhumi Pujan of new building of Shri Dnyaneshwar Vidyaniketan School Ajivali Javan

आजिवली येथील श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न

May 10, 2026
inspiring story of Seema pathare from Tung village After 17 years she achieved success in ssc exam with her son and nephew

तुंग गावातील सीमाताईंची प्रेरणादायी गाथा.. तब्बल १७ वर्षांनी मुलगा व पुतण्यासोबत दहावीची परीक्षा देत मिळविले घवघवीत यश

May 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.