नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर विचार व्यक्त करताना मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी तालुक्यातील गुन्हेगारी, अवैध धंदे आणि विकासकामांवरील स्थगिती, धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन, औद्योगिक क्षेत्रातील संपादित जमिनीचा शेतकऱ्यांना मोबदला, तरुणांना रोजगार, ग्रामीण भागातील रस्ते, आरोग्य सुविधा, नागरिकांची सुरक्षा, कायदा सुव्यवस्था अशा विविध मुद्द्यांवर आक्रमक भूमिका मांडली. ( MLA Sunil Shelke Aggressive In House On Issues Of Crime Development Works While Speaking On Motion In Final Week Video )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
‘मागील अडीच वर्षात मूलभूत सुविधा व प्रश्नांकरता महाविकास आघाडीने बाराशे कोटी रुपये दिले. सध्याचे सत्ताधारी सरकार जर खरोखरच जनतेचे सरकार, सर्वसामान्यांचे सरकार असेल तर त्यांनी आगामी काळात किमान 600 कोटी रुपये तरी निधी द्यावा,’ अशी रोखठोक भुमिका आमदार सुनिल शेळके यांनी सभागृहात मांडली.
अधिक वाचा –
– कोथुर्णेच्या निर्भयाला न्याय द्या, मुख्यमंत्र्यांनी मदत करावी, अजितदादांची सभागृहात मागणी – पाहा व्हिडिओ
– मुळशी संघर्ष समितीच्या आंदोलनावर रोखठोक चर्चा । राजकारण्यांच्या तालुक्यात राजकारणापासून अलिप्त राहून काम कसं करणार?