राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मावळ तालुका दिव्यांग सेलच्या महिला अध्यक्षपदी पवनमावळमधील शिळींब येथील सारिका बाजीराव ढमाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मावळ राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे अध्यक्ष सुभाष शेडगे आणि मावळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी सारिका ढमाले यांची पदावर नियुक्ती केल्याचे पत्र प्रसिद्ध केले. त्यानंतर कुलस्वामिनी महिला मंच मावळच्या संस्थापक अध्यक्षा आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या पत्नी सारिका शेळके यांच्या हस्ते आणि मान्यवरांंच्या उपस्थितीत सारिका ढमाले यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. ( Sarika Dhamale Apointed as woman president of Nationalist Congress Party Maval Taluka Divyang Cell )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार, राष्ट्रीय महिला अध्यक्ष श्रीमती फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, रूपाली चाकणकर आणि मावळचे आमदार सुनिल शेळके यांना अभिप्रेत असणारी पक्ष संघटना बांधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आणि पक्षाच्या बळकटीकरणासाठी, पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करत राहण्याची जबाबदारी सारिका ढमाले यांच्यावर देण्यात आली आहे. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत आपण कार्य करत राहणार, असा विश्वास सारिका ढमाले यांनी दैनिक मावळशी बोलताना व्यक्त केला.
अधिक वाचा –
– मावळ भाजपाची मासिक सभा संपन्न; शिळींब गावातील मनिषा चोरघे यांना संजय गांधी निराधार योजनेचे मंजूरी पत्र प्रदान
– केंद्रीय अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा, देशात 157 नवीन नर्सिंग कॉलेज उभारणार
– गरिबांना 2024 पर्यंत मोफत रेशन मिळणार, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा!